निंभोरा बुद्रुक ग्रामपंचायत कडून नवीन गटारीचे भूमिपूजन ग्रामपंचायतीच्या वतीने मोठ्या उत्साहत आणि न्यूज बातम्या द्वारे प्रसिद्ध केल्या होत्या. निंभोरा बुद्रुक परिसरातील सांडपाणी रस्त्यावर येऊन शासनाच्या मालमत्तेचे नुकसान होत आहे. मोटरसायकल वर एक व्यक्ती दसनूर कडे जात असताना त्यांच्यासोबत त्यांचा परिवार होता.
रस्त्या ची दुर्दशा झाल्याने ती मोटरसायकल गड्ड्यामध्ये आदळल्याने मोठी दुर्घटना घडण्यापासून थोडक्यात बचावले.
तरी पावसाळा जवळ आलेला असून त्या खड्ड्यामध्ये पाणी साचत असल्याने रस्त्याची दुरवस्था झाली आहे.
मोठा अपघात घडू नये.
त्या आधीच ग्रामपंचायतीने सांडपाण्याची विल्हेवाट लावावी. व रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करण्यात यावा.
तसेच रस्त्यावरील वडाच्या झाडाजवळ पाईप किंवा धापे टाकून पावसाळ्याचे पाणी गटार मध्ये काढावे.पावसाळ्या मध्ये रस्त्याला नाल्याचे स्वरूप होते.त्यामध्ये घाणीयुक्त पाणी असते ये - जा करणाऱ्यांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत असतो आणि त्या पाण्यापासून घाणीयुक्त पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता असते.
तसेच त्या ठिकाणी महिला उघड्यावर शौचालयाला जात असतात. त्या ठिकाणी नवीन शौचालय बांधून पाण्याची व्यवस्था करून देण्यात यावी.तसेच ग्रामसेवक आणि सरपंच यांनी लक्ष देऊन मागणी गांभीर्याने घेऊन त्वरित उपाययोजना करावे अशी मागणी निळे निशाण सामाजिक संघटनेचे वाहतूक शाखा रावेर तालुकाध्यक्ष शरद तायडे व परिसरातील महिला व नागरिकांनी केली आहे.
टिप्पणी पोस्ट करा