दि.१३/०६/२०२३ रोजी चोपडा तालुका जि.जळगाव. चोपडा येथे अक्षय भालेराव हत्येप्रकरणी निळे निशाण सामाजिक संघटने च्या वतीने तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला.
नांदेड जिल्ह्यातील बोंढार अक्षय भालेराव याची जातीय द्वेष भावनेतून निर्घृण हत्या करण्यात आली आहे.तरी जातीयवादी मानसिकतेच्या मारेकऱ्यांना फाशी ची शिक्षा देण्यात यावी तसेच CDR काढून त्यांच्या संपर्कातील व्यक्तीवर सुद्धा कारवाई करून मारेकऱ्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींवर ही कठोर कारवाई करण्यात यावी .
अक्षय भालेराव या तरुणांच्या कुटुंबाची परिस्थिती हलाकीची असून त्या कुटुंबातील कमवता व्यक्ती ह्या जातीयवादी मानसिकतेच्या लोकांनी जातीयद्वेषापोटी संपविला आहे.त्या मुळे अक्षय भालेराव यांच्या कुटुंबीयांचा खचला आहे तरी त्यांच्या कुटुंबियांना ५०,००००-/(पन्नास लक्ष रुपये ) आर्थिक मदत व कुटुंबातील एकाला शासकीय नोकरी देण्यात यावी अशी मागणी ही करण्यात आली.
मोर्चा निळे निशाण सामाजिक संघटने चे संस्थापक अध्यक्ष आनंदभाऊ बावीस्कर यांच्या मार्गद्शनाखाली तसेच संघटनेचे जिल्हा अध्यक्ष सतिश जी वाडे तसेच संघटनेचे महिला आघाडी जिल्हा प्रमुख प्रतिभाताई भालेराव यांच्या उपस्थित चोपडा तालुका महिला आघाडी अध्यक्ष अनीताताई बावीस्कर यांच्या नेतृत्वाखाली हजारोंच्या संख्येने असलेला जनसमुदायाचा चोपडा तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला.
त्या प्रसंगी,अशोक तायडे, विलास तायडे, लक्ष्मीताई मेढे, गीताताई वाघ,पिंकीताई सुतार,सतीश अडकमोल, तस्लिम पठाण,राहुल भिलाला, व इतर हजारोंच्या संख्येने बहुजन कार्यकर्ते मोर्च्यात सहभागी होते.
टिप्पणी पोस्ट करा