बस ५० फूट उंच पुलावरून कोसळली; स्फोट व्हावा तसा मोठा आवाज, १० हून अधिक जणं जागीच ठार अन्.


बस ५० फूट उंच पुलावरून कोसळली; स्फोट व्हावा तसा मोठा आवाज, १० हून अधिक जणं जागीच ठार अन्.

इंदौर :मध्य प्रदेशातील खरगोनमध्ये मोठा अपघात झाल्याचे समोर आला आहे.

एक प्रवासी बस तब्बल 50 फूट उंच पूलावरून बस खाली कोसळल्याने 10 जणांहून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर बरेच जण जखमीही झाले आहेत. ही बस खरगोनच्या खरगोन टेमला मार्गावरील दसंगा येथे पोहोचली होती. तेव्हा बस चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं अन् बस थेट पुलाखाली कोसळली.

अपघातातील जखमी प्रवाशांवर उपचार सुरू आहेत. काहींच्या डोक्याला मार लागला तर अनेकांचे हातपाय मोडल्याचीही माहिती मिळत आहे. तर या सर्वांवर उपचार करण्यात येत आहेत. या अपघाताची माहिती मिळाल्यावर मध्य प्रदेश सरकारने जखमींवर मोफत उपचार तर मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 4 लाख रुपये भरपाई देण्याची घोषणा केली आहे. बस 50 फूटावरुन कोसळली तेव्हा मोठा स्फोट व्हावा तसा मोठा आवाज झाला. त्यामुळे आजूबाजूच्या गावातील लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा त्यांना बस कोसळल्याचं दिसून आलं.

0/Post a Comment/Comments