जळगाव;कानळदा (ता. जळगाव) येथील ग्रामस्थ बैलगाडीने अवैध वाळू वाहतुक करताना आढळून आल्याने मंडळ अधिकाऱ्यांनी त्यास थांबवले असता त्याने हुज्जत घालून थेट कॉलर पकडल्याची घटना घडली.
याबाबत तालूका पेालिसांत गुन्हा दाखल झाला आहे. तक्रारीत नमुद केल्यानुसार, मंडळ अधीकारी किरण खंडू बाविस्कर (वय ४४) यांनी शुक्रवारी (ता. १९) सकाळी नऊच्या सुमारास कानळदा गावात बैलगाडीने वाळू वाहतुक करणाऱ्या संशयीतास हटकले.
चौकशी केल्यावर बैलगाडी चालक मनोज रतन पारधी असे त्याचे नाव असल्याचे समोर आले. बेकायदेशीर वाळू चोरुन नेत असल्याने बाविस्कर यांनी त्याला वाळूने भरलेली बैलगाडी जळगाव तहसील कार्यालयात नेण्यास सांगीतले. मात्र, त्याने विरोध करत हुज्जत घातली.
सोबत त्याचा मुलगा दीपक पारधी, पत्नी सुनंदा (सर्व, रा. कानळदा) यांनी वाद घातला. मनोज पारधी याने थेट मंडळाधिकारीबाविस्कर यांची कॉलर पकडून धक्कबुक्कीकेली. या प्रकरणी तालूका पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, उपनिरीक्षक नजयन पाटील तपास करत आहेत.
टिप्पणी पोस्ट करा