बुद्ध पौर्णिमेच्या पावन दिनी निळे निशाण सामाजिक संघटनेच्या युवासेनेची समता संदेश रॅली संपन्न
दि .०५ मे २०२३ शुक्रवार रोजी निळे निशाण सामाजिक संघटनेचे संस्थापक / अध्यक्ष आनंदभाऊ बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाने सावदा रेल्वे स्टेशन ता रावेर येथिल विश्वरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या पासून ते मोहराळा ता .यावल येथिल विश्वरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या पर्यंत निळे निशाण सामाजिक संघटना युवासेनेच्या वतिने समता संदेश मोटर सायकल रॅली काढण्यात आली . रॅलीचे मुख्य आर्कषण विश्ववंदनीय भगवान गौतम बुद्धाची मूर्ती रॅली सावदा स्टेशन मार्ग सावदा , फैजपुर , हंबर्डी , हिंगोणा , सांगवी , चितोडा , यावल , विरावली , कोरपावली मार्गे मोहराळा येथे रॅलीचा समारोप करण्यात आला.
व मोहराळा येथे विश्वरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळाचे नुतनीकरण निळे निशाण सामाजिक संघटनेचे संस्थापक / अध्यक्ष आनंदभाऊ बाविस्कर यांच्या हस्ते करण्यात आले त्या प्रसंगी मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते .
रॅलीचे आयोजन निळे निशाण सामाजिक संघटना युवासेना सागर बाविस्कर यांनी केले होते . समता संदेश मोटर सायकल रॅलीचे नेतृत्व संघटनेचे जळगाव जिल्हा उपप्रमुख अशोकभाई तायडे , फैजपुर विभाग उपप्रमुख विलास भास्कर , रावेर तालुका युवक अध्यक्ष विजय धनगर , यावल तालुका अध्यक्ष विलास तायडे , यावल तालुका युवक अध्यक्ष सतीश अडकमोल , इकबाल तडवी यांनी केले तर मोटर सायकल रॅली यशस्वी करण्याकरिता वासुदेव महाजन , अनिल धनगर , चंद्रकांत कोळी , राहुल तायडे , सुमित बाविस्कर ,योगेश साळवे , प्रमोद तायडे , रोशन मेढे , अनिकेत मोरे यांनी मेहनत घेतली.
टिप्पणी पोस्ट करा