ग्राम विकास अधिकारी अतुल पाटील यांनी विवरे ॥ खु।। पाठोपाठ चिंचोल ता . मुक्ताईनगर येथे ही केली आहेत मजूर न लावताच कामे : माहितीच्या अधिकारात झाली माहिती उघड


रावेर;तालुक्यातील विवरा खु।। येथे कार्यरत ग्राम विकास अधिकारी अतुल पाटील यांनी विवरा खु।। पाठोपाठ मुक्ताईनगर तालुक्यातील चिंचोल आणि मेहुन ग्रामपंचायतीला कार्यरत असताना १४ वा वित्त आयोगाचा निधी खर्च करताना मजुरच लावलेली नसल्याची बाब माहितीच्या अधिकारात मागितलेल्या माहितीत उघड झाली आहे.

खिरवड येथील नजमुद्दीन शेख यांनी ही माहिती विचारली होती.अतुल पाटील यांनी बेकायदेशीरपणे कार्यरत ग्रा प ला कामे केली असून आर्थिक अनियमितता केल्याची नजमुद्दीन शेख यांची मूळ तक्रार आहे.प्रशासन नेमकी या बाबत ग्राम विकास अधिकाऱ्यावर आता कोणती कार्यवाही करणार याची उत्सुकता रावेर आणि मुक्ताईनगर येथे लागून आहे.

0/Post a Comment/Comments