महिला कुस्तीपटू सोबत झालेल्या अन्यायाचा क्रीडाप्रेमींकडून निषेध

जळगाव -दिल्ली येथे महिला खेळाडू सोबत दिल्ली पोलिसांनी केलेल्या कृत्याचा जळगाव येथील क्रीडा प्रेमींनी निषेध नोंदवित, दिल्ली पोलिसांवर त्वरित कारवाई करण्यात यावी व महिला खेळाडूंच्या न्याय मागण्या ची पूर्तता करण्यात यावी अशी मागणी महामहिम राष्ट्रपती द्रोपदी मूर्म यांच्याकडे जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्यामार्फत निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे.

दिल्ली पोलीस हाय हाय..अशा घोषणा देण्यात आल्या.आपल्या भावना महामहीम राष्ट्रपतींना कळविण्यात येईल असे आश्वासन जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी शिष्टमंडळाला दिले. जळगाव जिल्हा व राज्यस्तरीय विविध क्रीडा संघटनाचे पदाधिकारी फारुक शेख, सामाजिक न्याय विभागाच्या प्रमुख श्रीमती प्रतिभा शिरसाठ, बास्केटबॉल ,बुद्धिबळ व स्केटिंग चे प्रशिक्षक संजय पाटील, ध्यानचंद अकॅडमीचे सत्यनारायण पवार, कॅरम संघटनेचे सय्यद मोहसीन, फुटबॉल संघटनेचे चंद्रशेखर देशमुख व ताहेर शेख , हॉकी संघटनेचे भुसावळचे इम्तियाज शेख, लियाकत अली व अकील शेख, राष्ट्र वादी काँग्रेसचे चे अध्यक्ष मजहर पठाण, अपंग संघटनेचे मुजाहिद खान, कुल जमातीचे अध्यक्ष सय्यद चांद , मरकज फाउंडेशनचे मोहसिन युसुफ, हुसेनी सेना चे फिरोज शेख, तांबापुर फाउंडेशनचे वसीम बापू व शाहरुख बागवान, इमदाद फाउंडेशनचे मतीन पटेल, ए ऊ शिकलगार फाउंडेशनचे अन्वर खान,आसिफ शेख,जुबेर शेख सुलतान आदींची उपस्थिती होती.

जळगाव जिल्ह्यातील सुमारे शंभरच्या वर क्रीडा संघटना आहे संघटनांचे मिळून सुमारे दहा हजार खेळाडू आहेत विविध महिला संघटना आहे परंतु आमच्या महिला खेळाडूंसोबत झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आंदोलन जळगावी होत असताना सुद्धा त्यात खेळाडू,क्रीडा संघटनाचे पदाधिकारी व खास करून महिला संघटना ची अनुपस्थिती जाणवत असल्याची खंत क्रीडा संघटनेचे व या आंदोलनाचे समन्वयक फारूक शेख यांनी व्यक्त केलेली आहे.

0/Post a Comment/Comments