दि .०५ मे २०२३ शुक्रवार रोजी बुध्द पौर्णिमेच्या पावन दिनी सावदा रेल्वे स्टेशन विश्वरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर पुतळाते मोहराळा ता . यावल विश्वरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या पर्यत मोटर सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे .
तरी सर्व पदाधिकारी / कार्यकर्त्यानी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे व येताना मोटर सायकलला पंचशिल ध्वज बांधून रॅलीत सामिल व्हावे . रॅली ही विश्ववंदनीय गौतम बुद्ध यांच्या जयंती निमित्त निळे निशाण सामाजिक संघटना युवासेना यांच्या वतिने समता संदेश रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे रॅलीचे नेतृत्व संघटनेचे जळगाव जिल्हा उपप्रमुख अशोकभाई तायडे , जळगाव जिल्हा कार्यध्यक्ष सदाशिव निकम , फैजपुर विभाग प्रमुख भगवान आढाळे , फैजपुर विभाग उपप्रमुख विलास भास्कर , रावेर तालुका अध्यक्ष सुधीर सेंगमिरे , यावल तालुका अध्यक्ष विलास तायडे , युवक रावेर तालुका अध्यक्ष विजय धनगर , युवक यावल तालुका अध्यक्ष सतिश अडकमोल हे करणार असून मोहराळा ता . यावल येथे विश्वरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे नुतनिकरण संघटनेचे संस्थापक / अध्यक्ष आनंदभाऊ बाविस्कर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे .
तरी बहुजन समाजातील बांधवांनी मोठ्या संख्येने समता संदेश रॅलीत सहभागी व्हावे असे आवाहन निळे निशाण सामाजिक संघटने चे संस्थापक अध्यक्ष आनंद भाऊ बावीस्कर यांनी केले आहे.
" उठ बहुजना जागा हो , निळे निशाणचा धागा हो "
आपले विनित
सौ . नंदाताई बाविस्कर
सौ . लक्ष्मीताई मेढे
सौ . विद्याताई बाविस्कर
युनासेना सागर बाविस्कर
इकबाल तडवी
नजाराम बारेला
बहुजन समाजाची एकजुट दाखवन्या करिता मोठ्या संख्येने सामिल व्हावे .
जय शिवराय जय भिम जय संविधान जय कांशीराम जय निळे निशाण
टिप्पणी पोस्ट करा