रावेर तालुक्यातील निंभोरा बुद्रुक येथे निंभोरा बालवाडी रस्ता दीपक मोरे यांच्या घराजवळ गटारीचे पाईप फुटून गटारी वरती खूप मोठे खड्डे पडल्याने नागरिकांना येण्या जाण्या साठी मोठा त्रास सहन करावा लागतो.शेख आयन शेख जाकीर हे व्यक्ती त्या नालीमध्ये पडल्याने सुदैवाने त्या ठिकाणी अनुसूचित प्रकार घडला नाही. त्या रस्त्याने वाहन ये जा करत असतात तसेच छोटा मोठा अपघात होण्याआधी माननीय सरपंच सचिन महाले यांनी आणि ग्राम विस्तार अधिकारी यांनी गटार दुरुती करून रस्त्या कडे लक्ष घालून मोठा अपघात घडण्याच्या आधी तेथे धापा टाकून जनतेसाठी रस्त्याची दुरुस्ती करून देण्यात यावी तसेच मालवाहतूक धारक आणि छोटे वाहनधारक मोठ्या कसरतीने आपले वाहन पास करत असून तेथे वाहन पलटी होण्याची दाट शक्यता असून काही अनुचित प्रकार घडण्याच्या आधी ते दुरुस्ती करण्यात यावे.
असे नागरिकांनी व निळे निशान सामाजिक संघटना वाहतूक शाखा रावेर तालुका अध्यक्ष शरद तायडे यांची मागणी.
टिप्पणी पोस्ट करा