रविंद्र भाऊराव जोशी असे या लेखा अधिका-याचे नाव आहे.
या घटनेतील तक्रारदार यांनी पत्नीच्या नावे आदिवासी मुलांना वस्तीगृहात लागणा-या दैनंदीन भोजनाचा ठेका घेतला होता. अमळनेर येथील दहीवद येथे मे.सप्तश्रृंगी माता आदिवासी महिला बहुउद्देशीय संस्था या नावाने ही संस्था आहे. या संस्थेमार्फत चोपडा येथील आदिवासी मुलांच्या वस्तीगृहात भोजन पुरवण्याचा तक्रारदार यांनी पत्नीच्या नावे सन 2021 - 22 या कालावधीसाठी ठेका घेतला होता.
या ठेक्याचा मोबदला म्हणून संस्थेच्या बॅंक खात्यात 73,00,000 रुपये डीडीच्या माध्यमातून अदा करण्यात आले आहेत. या कामच्या मोबदल्यात अर्धा टक्का या हिशेबाने सुरुवातीला जोशी याच्याकडून सुरुवातीला 36,500 रुपयांची तक्रारदाराकडे मागणी करण्यात आली. तडजोडीअंती विस हजार रुपये मागण्यात आले. लाचेची विस हजाराची रक्कम यावल कार्यालयात स्वीकारल्यानंतर दबा धरुन बसलेल्या एसीबी पथकाने लेखा अधिकारी जोशी यांना रंगेहात पकडले. याप्रकरणी यावल पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सापळा पर्यवेक्षण अधिकारी तथा पोलिस उप अधिक्षक शशिकांत पाटील यांच्या अधिपत्याखाली तपास अधिकारी पोलिस निरीक्षक श्रीमती.एन.एन.जाधव, पो.नि. संजोग बच्छाव तसेच सहायक फौजदार दिनेशसिंग पाटील, स.फौ.सुरेश पाटील, पो.हे.कॉ. अशोक अहिरे, सुनिल पाटील, शैला धनगर, पो.ना.जनार्दन चौधरी, पो.ना.किशोर महाजन, पो.ना.सुनिल वानखेडे, पो.ना.बाळु मराठे, पो.कॉ.प्रदीप पोळ, अमोल सुर्यवंशी, पो.कॉ. प्रणेश ठाकूर, राकेश दुसाने, आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.
टिप्पणी पोस्ट करा