पुढाऱ्यांसाठी बातमी, थांबा विचार करूनच जा; येथे गेलात तर पडेल कांद्यांचा मार

पुढाऱ्यांसाठी बातमी, थांबा विचार करूनच जा; येथे गेलात तर पडेल कांद्यांचा मार

मालेगाव : कांद्याचे भाव कोसळल्याने शेतकरी आक्रमक झाला आहे.

तर कांद्याला अनुदान देण्यासाठी शेतकऱ्यांनी व शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शासनाविरोधात रोष व्यक्त करायला सुरूवात केली आहे. यादरम्यान शेतकरी आणि शेतकरी संघटनांनी काल रस्ता रोको केलं. त्यानंतर आज थेट खासदार, आमदारसह सर्व पक्षीय पुढाऱ्यांनाच इशारा दिला आहे. शेतकरी क्रांती मोर्चाने सटाणा, बागलाण तालुक्यात खासदार, आमदारसह सर्व पक्षीय पुढाऱ्यांना केली गाव बंदी केली आहे.

नाशिक जिल्ह्यातील जवळपास सर्वचं बाजार समित्यात कांद्याचे भाव मोठया प्रमाणात कोसळले आहेत. मात्र सर्वच पक्ष गप्प आहेत. यावरून बागलाणच्या मुंजवाड गावातील शेतकरी संतप्त झाले आहेत. तर शेतकरी क्रांती मोर्चाने खासदार, आमदार आणि सर्व पक्षीय पुढाऱ्यांना गाव बंदी करण्यात आल्याचे ठिकठिकाणी होर्डिंग लावले आहेत. तसेच जर पुढाऱ्यांनी गावात प्रवेश केल्यास त्यांना कांदे फेकून मारू असा इशारा देण्यात आला आहे.

0/Post a Comment/Comments