निळे निशान सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आनंद भाऊ बाविस्कर यांची घटनास्थळी अट्रावल गावात येथे भेट.
तसेच आज सकाळी अट्रावल गावात जी निंदनीय घटना घडली काही समाज कंटकानी दगड फेक केली होती. त्या दगड फेकीत काही समाज कंटकांनी बाबासाहेबांच अस्तित्व संपवायचा असा एक लहान मुलांसारखा प्रकार केलेला होता.
परंतु आपल्या सर्वांना माहीत आहे की डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच अस्तित्व हे कोणी संपवू शकत नाही आयुष्यात कधी संपणार ही नाही.
पोलीस प्रशासनाने तात्काळ या घटनेचे गार्भिय ओळखून त्या समाज कंटकांना ताब्यात घेतलेले आहे .काही लोकांचा शोध पोलिस प्रशासन घेत आहेत
या ठिकाणी काही समाज कंटकांनी दगड फेक केली होती.तर त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाच्या उपस्थित त्या ठिकाणी डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा पुन्हा विधीवत बसवण्यात आला आहे.
तसेच गावात सर्व शांतता आहे काही लोक अफवा पसरवण्याचा प्रयत्न करतील .तरी माझी समाज बांधवांना विनंती आहे कोणी ही अफवांवर विश्वास ठेवू नये . व समाजाने शांतता ठेवावी जे समाज कंटक असतील त्यांना कायदा काय आहे हे आपल्याला दाखवून द्यायचा आहे.
आणि आपण जो ही पाऊल उचलायचा तो कायद्याच्या मार्गाने उचलायचा असे निळे निशाण सामाजिक संघटनेचे संस्थापक / अध्यक्ष आनंद भाऊ बाविस्कर यांनी सांगितले. घटनास्थळी नंदाताई बाविस्कर,विलास तायडे ,इकबाल तडवी,लक्ष्मिताई मेढे , विलास भास्कर , सतिश अडकमोल , अनिल इंधाटे आदी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा