एक्सलेटरचे पेंडल तुटले, चालकाने चक्क दोरीच्या सहाय्याने चालवली बस

कसारा घाटात एसटी बसच्या एक्सलेटरचे पेंडल तुटल्याने चालकाने दोरीच्या सहाय्याने प्रवासी बस नाशिक बसस्थानकात पोहोचवली.

अंगावर शहारे आणणाऱ्या प्रवासात प्रवासी भयभीत झाले होते. मात्र हा प्रवास सुखरूप झाल्याने सर्वांचाच जीव भांड्यात पडला.

कल्याण-विठ्ठलवाडी आगारातून अमळनेरला जाणारी एस. टी. बस प्रवाशांना घेऊन निघाली होती. मात्र कसारा घाटात भरधाव वेगाने येत असताना अचानक बिघाड होऊन बसच्या एक्सलेटरचे पेंडल तुटले. अशातही बस चालकाने शिताफीने बस थांबवली. इगतपुरी आगारातील कारागिरांकडून बसचे पेंडल दुरुस्त न झाल्याने चालकाने डोके लावत अॅक्सिलेटरला दोरी बांधून दोरीच्या सहाय्याने गाडी कंट्रोल करून बस सुरू केली. एकाच्या हातात स्टेअरिंग तर दुसऱ्याच्या हातात दोरीचा वापर करत चालकाने बस चालवली आणि अशा अवस्थेत दोरीच्या सहाय्याने थेट नाशिक आगार गाठले.

धावत्या बसमधली ही दृश्य एका प्रवाशाने मोबाइल कॅमेऱ्यात कैद करीत हा प्रवास किती थरारक ठरला अशी कैफियत अमळनेरला गेल्यावर तेथील आगारप्रमुखांना सांगितली.

0/Post a Comment/Comments