रावेर तालुक्यातील खिरोदा येथील तक्रारदार यांची वडिलोपार्जित शेती ही खिरोदा तलाठी सजा यांच्या हद्दीमध्ये असून तक्रारदार यांचे मोठे भाऊ मयत झालेले असल्याने सदर शेत जमीनिचे ७/१२उताऱ्यावर त्यांच्या मयत भावाची पत्नी व मुलगा यांचे नावे वारस म्हणून घेण्याच्या मोबदल्यात संबधित तक्रारदार यांच्याकडे खिरोदा सजाचे तलाठी प्रमोद प्रल्हाद न्यहदे वय(४५)यांच्या वतीने कोतवाल शांताराम यादव कोळी वय (५२) रा. खिरोदा ता.रावेर यांनी ४०००हजार रुपयांची लाच स्वतः तलाठी कार्यालय खिरोदा येथे स्वीकारली म्हणून वरील दोन्ही आरोपीविरुद्ध सावदा पोलीस स्टे. ला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच पुढील कारवाई ला. प्र .जळगाव विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी शशीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक एस.के बाच्छाव, पो. ना. ईश्वर धनगर ,पो .का.राकेश दुसाने, स . फौ.दिनेशसिंग पाटील, स .फौ.सुरेश पाटील, पो.हे.का.सुनील पाटील, पो.हे.का.रवींद्र घुगे, म.पो.हे का शैला धनगर,
पो. ना .जनार्दन चौधरी, पो. ना बाळू मराठे , पो.का.प्रदीप पोळ, पो.का.अमोल सूर्यवंशी,पो.का. प्रणेश ठाकूर यांच्या पथकाने कारवाई केली.
टिप्पणी पोस्ट करा