आरोपींना घेऊन जाणारे पोलिसांचे वाहन उलटले, पाच जण जखमी

अट्रावल दंगलीतील तीन संशयित आरोपींना ताब्यात घेऊन यावलकडे निघालेल्या पोलिसांचे वाहन बुधवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास कडगाव रस्त्यावर उलटले. या अपघाता दोन पोलिसांसह तिन्ही संशयित आरोपी जखमी झाले असून जखमींवर रूग्णालयामध्ये उपचार सुरू आहे.

अट्रावल गावातील दंगलीतील संशयित धरणगाव तालुक्यात असल्याची माहिती यावल पोलिसांना मिळाली होती. बुधवारी पहाटेच यावल पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेऊन जळगाव मार्गे यावलकडे निघाले होते. सकाळी ७ वाजेच्या सुमारास कडगाव रस्त्यावरील खड्डयांमुळे चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि वाहन रस्त्याच्याकडेला पलटी झाले. 

या अपघातात पोलीस उपनिरीक्षक सुदाम काकडे आणि पोलीस कॉन्स्टेबल अशोक बाविस्कर हे जखमी झाले. तर तिन्ही संशयित हे किरकोळ जखमी झाले. पोलिसांवर खाजगी रूग्णालयात उपचार सुरू असून संशयितांना जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आलेले आहे.

0/Post a Comment/Comments