बुद्ध हा विष्णूचा अवतार असा प्रचार नको !

गौतम बुद्ध स्वतःला साधा मनुष्य मानतात, एखादा जीव या शृष्टीतून नाहीसा झाल्यास तो पून्हा जन्म घेत नाही. बुध्दाने मांडलेले तत्वज्ञान पूर्णपणे विज्ञानवादी आहे.

तथागत बुद्धाचा धम्म हा मानवतावादी धम्म असून त्याकाळच्या धर्म प्रवहाच्या विरोधात होता. म्हणून बुद्धाचे तत्वज्ञान आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी धम्मामध्ये 22 प्रतिज्ञा का दिल्या याचे महत्व जाणणे नितांत गरजेचे आहे. बुद्ध हा विष्णूचा अवतार नाही, केवळ खोटा आणि खोटा प्रचार आहे.त्यामूळे बुद्ध हा विष्णूचा अवतार असा प्रचार नको असे मत भदन्त डॉ.उपगुप्त महाथेरो,भदन्त धम्मशिल थेरो यांनी व्यक्त केले. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त सार्वजनिक जयंती उत्सव समिती बीडकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने सोमवार (दि.3) रोजी धम्मदेसना कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना भदन्त डॉ.उपगुप्त महाथेरो,भदन्त धम्मशिल थेरो बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डोंगरे नाना तर प्रमुख पाहुणे म्हणून आचार्य सर यांची उपस्थिती होती. उपस्थितांना संबोधित करताना भदन्त डॉ.उपगुप्त महाथेरो,भदन्त धम्मशिल थेरो म्हणाले की, धम्म सर्वांना सोबत घेऊन जाणार आहे. बौद्ध धम्म हा बुद्धाच्या नैतिकतेमुळे सर्व दूर वाढला. त्यामुळे सूक्ष्मपणे बुद्धच्या धम्माकडे पाहिले पाहिजे. बुद्ध धम्मात स्त्री पुरुष भेद मानत नाही. अज्ञानामुळे दुःख होते, बुद्धाने ते दुःख दूर करण्याचे काम केले. दैववादामुळे भारत जगात मागास आहे. एवढेच नाही तर माणसे अंधश्रद्धेच्या कोंडवाड्यात राहावीत असे प्रयत्न सुरू आहेत.

त्यामुळे आंबेडकरी चळवळीने अजून सावध राहिले पाहिजे. नवं संकल्प करून जयंतीला अभिवादन करावे असे परखड मत भदन्त डॉ.उपगुप्त महाथेरो,भदन्त धम्मशिल थेरो यांनी व्यक्त केले. या व्याख्यान मालेचे प्रास्ताविक प्राचार्य पांडुरंग सुतार यांनी केले. सूत्रसंचालन लक्ष्मी सरपते, आभार शैलेजा ओव्हाळ यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती यांच्यासह आंबेडकरी कार्यकर्त्यांनी मोलाचे परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला आंबेडकरी जनसमुदाय मोठ्या संख्येने उपस्थित होता.

आज होणार व्याख्यान!

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन बीड येथे आज बुधवार (दि.5) रोजी सायंकाळी 7 वाजता व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. त्यामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर समस्त शोषितांच्या उत्थानाचा महामार्ग या विषयावर प्रा. डॉ. सागर जाधव आपले विचार मांडणार आहेत. त्यामुळे मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

0/Post a Comment/Comments