परंतु सदरील जलकुंभ हा पूर्णत: पाण्याने भरल्यानंतर दररोज एक ते दोन तास ओव्हरफ्लो चे पाणी एन उन्हाळ्याच्या दिवसात गटारीत मनसोक्त वाहत असते यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होत असून याकडे ग्रामपंचायत प्रशासन लक्ष देणार का असा सवाल सुज्ञ नागरिकांना पडला आहे.
तसेच खीर्डी खु. या गावात फक्त एक वेळ नळाला पाणी येत असून ऐन उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याचा सर्वाधिक वापर वाढत असून दोन वेळेस नळाला पाणी सोडण्याची मागणी ग्रामस्थांनी केली.
तर त्यांना नेहमी एकच उत्तर ऐकावसं मिळते ग्रामस्थांना पाणी वाचवायची सवय कशी लागेल.
एकीकडे दररोज एक ते दोन तास हजारो लिटर पाणी ओव्हरफ्लो चा पाईप द्वारे वाया जाते त्याचे सोयर सुतक ग्रामपंचायत प्रशासनाला नाही का?
असा सवालही या निमित्ताने उपस्थित होत आहे.
याकडे त्वरित लक्ष देऊन दररोज हजारो लिटर पाण्याची होणारी नासाडी थांबवावी याकरिता उपाय योजना करावी अशी मागणी सुज्ञ नागरिक करीत आहे.
टिप्पणी पोस्ट करा