यावल बाजार समितीत दोन्ही पॅनलकडून विजयाचे दावे !

यावल :संपुर्ण तालुक्याचे लक्ष वेधणार्‍या येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ संचालक पदाच्या निवडीसाठी शुक्रवारी शांततेत मतदान पार पडले आहे.

यावलसह फैजपूर साकळी येथे ही मतदान शांततेत पार पडले. तीन ही केन्द्रावर एकूण २६०४ मतदाना पैकी २४३८ मतदान झाले असून मतदानाची ९३.६३ टक्केवारी आहे. निवडणूक निर्णय अधिकारी पी.एफ. चव्हाण, निवडणुक निरिक्षक म्हणुन तहसीलदार महेश पवार, उप विभागीय पोलीस उपअधीक्षक डॉ.कुणाल सोनवणे यांनी मतदान केन्द्रांची सविस्तर माहीती घेतली तर आमदार शिरीष चौधरी यांनी आपल्या विधानसभा क्षेत्रातील सर्व मतदान केंद्रांना भेटी दिल्या व निवडणुकी संदर्भातील आढावा घेतला.
सकाळ पासूनच मतदानाचा वेग चांगला होता. या निवडणुकीच्या तिन मतदान केंद्रासाठी केन्द्रनिहाय एकुण आठ केंद्राध्यक्ष म्हणुन एस. पी. चकाल जळगाव, एम. गवळी जळगाव, एस. ए .साळुंखे जळगाव, आर. ए. येवले जळगाव, पी. एन. सुर्वे जळगाव, ए. जी. मेखे जळगाव , डी. जे. तडवी यावल आणी ई. ए. हावळे यांची नेमणुक करण्यात आली होती. 

यावल येथील बाजार समितीच्या सार्वजनिक पंचवार्षिक निवडणुकीचे मतदान शुक्रवारी शांततेत पार पडले सकाळी आठ पासूनच मतदानास वेग आला होता. दुपारीच्या वेळेस शहरासह तालुक्यात तुफानी वादळी वार्‍यासह पाऊस आल्याने काही काळ मतदान मंदावले होते त्यानंतर पुन्हा मतदानास वेग आला होता.
राष्ट्रवादी कॉंग्रेस ,कॉंग्रेस पक्ष आणी शिवसेना ( ठाकरे ) गटाच्या महा विकास आघाडी प्रणित शेतकरी विकास पॅनल व भाजप शिवसेना प्रणित सहकार पॅनल मध्ये, खरी लढत होणार असून,पाचअपक्ष उमेदवार देखील या निवडणुकीत आपले नशीब आजमावत आहे. मतदानानंतर दोन्ही पॅनल कडून उमेदवारांच्या विजयाचे दावे प्रतिदावे केले जात असले तरी मात्र रविवारी दुपारपर्यंत मतमोजणी नंतरच चित्र स्पष्ट होणार आहे.
एकूण मतदार संघ निहाय झालेले मतदान असे-

सेवा सह. संस्था-६०४/ ५९७ =९८.८४ टक्के

ग्रा. पं. ६५९/ ६४१=९७.२७ टक्के

व्यापारी ३३३/ ३२०=९६.१० टक्के

हमाल/तोलारी १००८/८८०=८७.३० टक्के

मतदानाच्या पेट्या उमेदवाराच्या समक्ष येथील पंचायत समितीच्या स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवण्यात आले असून त्यास सील लावण्यात आले आहे. ३० एप्रिल रविवार रोजी येथील पंचायत समितीच्या सभागृहात सकाळी १० वाजेपासून मतमोजणीला सुरूवात होणार आहे. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी पी एफ चव्हाण यांनी दिली आहे.

0/Post a Comment/Comments