रायपूर ग्रामपंचायतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जळगाव तालुक्यातील रायपूर गावात सर्व जाती व धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहत आहे. असे असतांना गावातील काही व्यक्तींचे मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे सुरू आहेत. यात गावठी दारूची विक्री, सट्टा व पत्त्याचे अवैध व्यवसाय सुरू आहेत. त्यामुळे तरूण पिढी याला बळी पडत असून अनेक घर उध्दवस्त होत आहे. दरम्यान, पोलीस स्टेशन येथून जवळ असून देखील पोलीस प्रशासनाकडून कोणतीही कारवाई केली जात नाही. बंद करणाचे सांगितल्यावर देखील अवैध धंदे करणाऱ्यांकडून दमदाटी केली जात आहे.
तसेच आम्ही पोलीसांना हप्ते देतो त्यामुळे आमचे कुणीही काहीही बिघडवू शकत नाही. त्यामुळे रायपूर येथील ग्रामपंचायतीच्या ठरावात दारूबंदीसह अवैध धंदे बंद करण्याचा ठराव एकमताने करण्यात आला आहे. रायपूर गावात सुरू असलेले अवैध धंदे बंद करण्यात यावे, अशी मागणीचे निवेदन रायपूर ग्रामपंचायतीच्या वतीने जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयातील विभागीय पोलीस अधिकारी यांना देण्यात आले. आहे. या निवेदनावर प्रभारी सरपंच प्रविण परदेशी , ग्रामपंचायत सदस्य वसंत सिताराम धनगर, उषाबाई परदेशी, पुष्पा परदेशी, शितल परदेशी, ग्रामसेवक जयपाल चिंचोरे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
टिप्पणी पोस्ट करा