यावल तालुक्यातील हंबर्डी येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी! सांस्कृतिक कार्यक्रमाला निळे निशाण सामजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आनंदभाऊ बावीस्कर यांची प्रमुख उपस्थिती!

यावल तालुक्यातील हंबर्डी येथे १४/०४/२०२३ रोजी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी.

 हंबर्डी येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या  जयंती निमित्त १२/०४/२०२३ रोजी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती निळे निशाण सामजिक संघटनेचे  संस्थापक अध्यक्ष आनंद भाऊ बावीस्कर,नंदाताई बाविस्कर, फैजपूर पोलीस स्टेशन चे. ए.पी.आय सिध्देश्वर आखेगावकर,पो. कॉ.राजेश बऱ्हाटे उपस्थित होते.
तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त १४/०४/२०२३ रोजी जेवणाचा कार्यक्रम करण्यात आला 
तसेच सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये ज्यांनी भाग घेतला होता त्यांना दि.१७/०४/२०२३ रोजी शाळेचे साहित्य बक्षीस वाटप जयंती समिती अध्यक्ष जितेंद्र शंकर तायडे यांच्या हस्ते करण्यात आले. 
त्या प्रसंगी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती  शांततेत व मोठ्या उत्साहात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून जय घोष्याच्या गजरात संपूर्ण गावात मिरवणूक काढून शांततेत पार पाडण्यात आली.
 त्या प्रसंगी जयंती समिती अध्यक्ष जितेन्द्र.शं.तायडे ,जयंती समिती उपाध्यक्ष विनोद.अ.मेढे,
कार्याध्यक्ष अतुल तायडे,खजिनदार अभय मेढे,कोष्याध्यक्ष राजवीर तायडे ,सहसचिव विश्वजित तायडे ,संपर्क प्रमुख ऋतिक तायडे,सिद्धार्थ तायडे,पुनीत तायडे ,आशिष वानखेडे,सतीश तायडे, राहुल ठाकरे,विशाल तायडे ,बंटी मेढे,विकास झाल्टे,
प्रशिक प्रबुद्ध मंडळ व संपूर्ण समाज बांधव उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments