यामध्ये कांदा, केळी व मका पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
जिल्ह्यातील काही भागांत शुक्रवारी (दि. 28) दुपारी ३ च्या सुमारास मेघगर्जना, वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. तसेच काही वेळात गारपिटीला सुरुवात झाली तब्बल 20 मिनिटे गारपीट झाली. त्यामुळे अनेक वृक्ष कोसळले, तर केळी उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले.
मुक्ताईनगर तालुक्यातील सातोड, तरोडा, रुईखेडा, ढोरमाळ, निमखेडी खुर्द आदी भागांत गारपिटीमुळे कांदा व मका पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे कळते. सुमारे अर्धा तासाच्या या गारपिटीमुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला. ऐन कापणीवर आलेल्या हजारो हेक्टरवरील केळीबागांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे केळी उत्पादक शेतकरी बांधवांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
टिप्पणी पोस्ट करा