भडगाव तालुक्यातील शिंदी कोळगाव येथील जवान दीपक मधुकर हिरे यांचे मुंबईत उपचार सुरू असतांना वीरमरण आले

भडगाव तालुक्यातील शिंदी कोळगाव येथील जवान दीपक मधुकर हिरे यांचे मुंबईत उपचार सुरू असतांना वीरमरण आले . त्यांच्या पार्थिवावर आज दि २६ रोजी दुपारी २ वाजता त्यांच्या शिंदी गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.  
यावेळी सेनेचे आमदार किशोर पाटील , भाजप चे पाचोरा तालुका अध्यक्ष अमोल शिंदे, भडगाव तहसीलदार मुकेश हिवाळे, पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील ,पोलीस पाटील गाव कामगार संघटना जिल्हा अध्यक्ष नरेंद्र शिंदे, पोलीस पथक, सैन्याचे (१०२) पथक, आदीं अधिकारी, नेते, नागरिकानी मानवंदना व श्रध्दांजली दिली. 

शिंदी कोळगाव ता. भडगाव येथील जवान दीपक मधुकर हिरे यांना शनिवारी २५ मार्च रोजी रात्री ८.४० वाजेच्या सुमारास तळोजा (मुंबई) या ठिकाणी वीरमरण झाले. स्व.दिपक हिरे हे सन-२००२ मध्ये गांधीनगर येथे सीआरपीएफ जवान म्हणून भरती झाले होते. त्यानंतर त्यांनी नागपूर येथे ट्रेनिंग व सैनिकाचे प्रशिक्षण पूर्ण केले. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी सेवेत 
केंद्रीय गृह संरक्षण मंत्री अमित शहा, उद्योगपती मुकेश अंबानी, अभिनेते सनी देओल यांच्या सह अनेक व्हीआयपी अभिनेते, उद्योगपती व राष्ट्रीय वरिष्ठ नेते यांचे अंगरक्षक म्हणून कर्तव्य बजावले आहे म्हणून कर्तव्य बजावले . व्हीआयपी संरक्षण टीममध्ये अंगरक्षक म्हणून नेहमी ते तत्पर होते. काही दिवस आधी छत्तीसगड मध्ये त्यांच्यावर सेवेदरम्यान आजरपणात उपचार झाले, नंतर आता उपचारा दरम्यान त्यांची प्रकृती अधिक खालावली, कुटुंबियांनी अनेक मोठ्या उपचार केंद्रांना जाऊन उपचार केले. मात्र अखेर त्यांना देश सेवा बजावताना उपचारा दरम्यान वीर मरण आले. देश सेवा करत असतांना हि आपली जन्मभूमी असलेल्या शिंदी गावात सुद्धा कुटुंबातील सदस्यांना समाजसेवेचा मौल्यवान सल्ला देऊन सामाजिक कार्यात संपूर्ण कुटुंबा सह अग्रेसर असत. स्व. दीपक हिरे यांचे आई, वडील शेतात दिवस रात्र मेहनत करून आपल्या दोन मुलांना यशस्वीपणे शिक्षण दिले. त्यापैकी दीपक हिरे यांना देशाच्या सेवेसाठी सीआरपीएफ मध्येच पाठवण्यासाठी कुटुंबियांची सहमती दिली होती. संपूर्ण गावात आदर्श असे कुटुंब असलेले हिरे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दुपारी गावात वीर दीपक हिरे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी गावातून भव्य शाहिद मिरवणूक काढण्यात आली होती. शाहिद जवान अमर रहे, वीर जवान अमर रहे , भारत माता कि जय आदी घोषणा देण्यात आल्या.माजी सैनिक फौंडेशन चे सदस्य , असंख्य जवान , अधिकारी, युवा, महिला नागरिक , लोकप्रतिनिधी , नातलग आदींची मोठी गर्दी श्रध्दांजली देण्यासाठी झाली होती. 

नितेश या लहानशा मुलाने अमर जवान दीपक हिरे यांच्या पार्थिवास अग्निडाग दिला. यावेळी सर्व वातावरण शोकमय झाले होते. पक्षात आई-वडील दोन भाऊ पत्नी दोन मुले असा मोठा परिवार आहे.

( सतीश पाटील, भडगाव तालुका प्रतिनिधी)

0/Post a Comment/Comments