तसेच डेरेदार वृक्षांची तोड करून ते डेरेदार वृक्ष भडगाव येथील विट भट्टी व स्वामिल वर जात आहे. या बाबत विट भट्टी या ठिकाणी डेरेदार वृक्ष हे कत्तल करून येतात कुठून? जर विट भट्टी समोर डेरेदार वृक्षाची लाकडे पडलेली आहेत, तर ते वन विभागाच्या अधिकारी यांना दिसत नाही का? दिसले तर त्याचा पंचनामा व त्यांच्यावर कारवाई का नाही? असे एक नाही तर अनेक प्रश्न समोर येत आहेत. तसेच विटभट्टी समोर पडलेली लाकडे व स्वामील मध्ये पडलेली अवैध वृक्षचा लाकडांचा पंचनामा करून भट्टी मालक, जागा मालक यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी व ते लाकडे वनविभागाने जमा करावी अशी मागणी जोर धरत आहे.
भडगाव तालुक्यात वृक्षतोड मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. वनविभागाचे याकडे मात्र अर्थपूर्ण दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे या वृक्षतोडीला वरदहस्त कोणाचा? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तालुक्यातून रोज किमान चार ट्रक भरून अवैध लाकडं बाहेर गावी जात आहेत. या सर्व प्रकाराकडे प्रशासन कानाडोळा करत असल्याचा आरोप वनमित्रांनी केला आहे.
भडगाव तालुक्यात भडगाव शहर, महिंडले, पळसखेड कजगाव, कोळगाव, गिरड, आमदडे, वाडे या परिसरात व्यापारी हे कडूलिंब, साग, आंबा, चिंच बाभूळ या झाडांची प्रशासनाकडून परवानगी न घेता तोड केली जात आहे. याकडे मात्र वनविभागाचे कर्मचारी व अधिकारी जाणीवपूर्वक डोळेझाक करत असल्याचा आरोप केला जात आहे. या वृक्षतोडीला आशीर्वाद कोणाचा, या अवैध लाकूड तस्करांवर सरळ हाताने गुन्हे दाखल करून सदर ट्रॅक्टर, ट्रॅक, आर. टी ओ कडे वर्ग करावी अशी मागणी उपस्थित केली जात आहे. यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करणार असल्याचे वन मित्रांनी सांगितले.
टिप्पणी पोस्ट करा