८ मार्च २०२३ महिला जागतिक दिनी निंभोरा ग्रामपंचायत मुर्दाबादच्या घोषणा देत केली महिला शौचालयाची मागणी - निळे निशाण सामाजिक संघटना

८ मार्च २०२३ महिला जागतिक दिनी निंभोरा ग्रामपंचायत मुर्दाबादच्या घोषणा देत केली महिला शौचालयाची मागणी - निळे निशाण सामाजिक संघटना
      रावेर तालुक्यातील निंभोरा ग्रामपंचायती वर ८ मार्च २०२३ महिला जागतिक दिनी निळे निशाण सामाजिक संघटना रावेर तालुका महिला आघाडीच्या वतिने महिलांच्या सन्मानात आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले 
     मोर्चा इंदिरा नगर ते निंभोरा ग्रामपंचायत असा काढण्यात आला मोर्चाचे नेतृत्व संघटनेचे संस्थापक / अध्यक्ष आनंदभाऊ बाविस्कर यांनी केले तर उपस्थितीत मुख्य कार्यालयीन सचिव नंदाताई बाविस्कर , फैजपुर विभाग प्रमुख भगवान आढाळे , युवक तालुका अध्यक्ष विजय बोरसे ( धनगर ) , वाहतूक शाखा तालुका अध्यक्ष शरद तायडे , तालुका उपाध्यक्ष चंद्रकांत सोनवणे ( कोळी ) , तालुका उपाध्यक्ष अनिल धनगर , तालुका उपाध्यक्ष वासुदेव महाजन , तालुका उपाध्यक्ष संजय तायडे , युवक तालुका उपाध्यक्ष विलास तायडे , युवक तालुका संपर्क प्रमुख विक्रांत तायडे , युवक तालुका प्रसिद्धी प्रमुख कुंदन तायडे मार्चा यशस्वी करण्यासाठी महिला आघाडीच्या रावेर तालुका अध्यक्षा विदयाताई बाविस्कर , तालुका उपाध्यक्षा आश्विनीताई अटकाळे , तालुका उपाध्यक्षा शारदाताई बेलदार , तालुका सचिव कविताताई शिंदे , तालुका कार्याध्यक्षा नलुताई सोनवणे यांनी परिश्रम घेतले .
   संघटनेचे संस्थापक / अध्यक्ष आनंदभाऊ बाविस्कर यांनी ग्रामसेवक व सरपंच यांना खडसावून सांगितले की महिलांसाठी शौचालय तात्काळ उभारण्यात यावे , बेघर - भुमीहिन ग्रामस्थाना हक्काची जागा देण्यात यावी , गोरगरिबांना रोजगार हमी योजनेत समाविष्ट करून जॉब कार्ड देण्यात यावे व इतर गावांतील अनेक समस्या सरपंच व ग्रामसेवक यांच्या समोर मांडल्या व सांगण्यात आले की येत्या पंधरा दिवसात समस्यांचे निवारण न झाल्यास तिव्र स्वरुपाचे आंदोलन संघटनेच्या माध्यमातून करण्यात येईल असे निवेदन देण्यात आले .
     त्याप्रसंगी शेकडो महिला व पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते

0/Post a Comment/Comments