कजगाव ता भडगाव येथे संध्याकाळी साडे चार ते पाच वाजेच्या सुमारास दोन ते तीन अज्ञात बंदुकधारी हल्लेखोरांनी एका सराफाच्या दुकानात घुसुन बंदूक दाखवून सशस्त्र लुटण्याचा प्रयत्न केला मात्र व्यापाऱ्याने आरडाओरड केल्याने धाडसी दरोड्याचा प्रयत्न फसला आहे मात्र ह्या सिनेस्टाईल सर्व प्रकाराने कजगाव येथे एकच खळबळ उडाली आहे
भर गर्दीच्या ठिकाणी घडलेल्या ह्या खळबळजनक घटनेने गावात एकच चर्चेला उधाण आले आहे.
गजबजलेल्या सराफ बाजारातील व्यापारी उमेश बोरा हे दुकानात असतांना दोन बंदुकधारी दुकानात शिरले व त्यांनी आपल्या जवळील बंदूक व्यापाऱ्याच्या दिशेने रोखली मात्र व्यापाऱ्याने प्रसंगवधान राखून वेळीच आरडाओरड केल्याने बंदुकधारी हल्लेखोरांनी हवेच्या वेगाने पळ काढला मात्र यावेळी धक्कादायक घटनेने एकच खळबळ उडाली होती मात्र सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही मात्र भर दिवसा सराफ व्यापाऱ्यांच्या दुकानावर केलेला हल्ल्याचा प्रयत्न हा मोठा चर्चेचा विषय झाला आहे ज्या ठिकाणी बंदुकधारी हल्लेखोरांनी दरोड्याच्या उद्देशाने बंदूक घेऊन दुकानात प्रवेश केला.
त्या सराफ बाजारात दिवभर मोठ्या प्रमाणावर गर्दी असते शिवाय गावातील मुख्य बाजारपेठ असल्याने येथे मोठ्या प्रमानावर आर्थिक उलाढाल होत असते ह्या सराफ बाजरात सेंट्रल बँक,महाराष्ट्र ग्रामीण बँक,जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, कमलशांती पतसंस्था अश्या अनेक बँक आहेत येथे साधारण दररोज लाखो व कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते मात्र येथे अश्या पद्धतीने होणारा बंधुकधारी हल्ला पहिल्यांदाच झाला आणि तोही भर दिवसा झाल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे,स्थानिक गुन्हेशाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्यासह भडगावचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील गुन्हेशाखेचे पोलीस उपनिरीक्षक गणेश चौबे यांनी पोलीस ताफ्यासह भेट देऊन पाहणी केली यावेळी पोलीस कर्मचारी पोलीस हवालदार विलास पाटील,सचिन वाबडे, पोलीस नाईक नरेंद्र विसपुते,स्वप्निल चव्हाण,नगरदेवळा दुरक्षेत्राचे कैलास पाटील,विनोद पाटील,नरेंद्र शिंदे,गुन्हे शाखेचे लक्ष्मण पाटील आदी पोलिसांचा फौजफाटा होता यावेळी बघ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणावर दिसून आली.
"":गुन्ह्यात वापरलेली गाडी सापडली आरोपी मात्र फरार
दरम्यान भर दिवस बंदूक दाखवून तुटण्याचा पर्यन्त करणारे भामटे निसटण्यात यशस्वी झाले मात्र कजगाव पासून वीस ते पंचवीस किमीवर असणाऱ्या गावाजवळ पोलिसांना गुन्ह्यात वापरलेली एम.एच.२० ई. ई.६४१३ ह्या क्रमांकाची स्विप्ट व्हीडीआय ही गाडी सापडली मात्र त्यातील आरोपी पसार झाले सदरील गुन्ह्यात वापरलेली गाडी देखील चोरीची असल्याची माहिती मिळाली आहे या संदर्भात पुण्यनगरीने पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी गाडी मिळाली व आरोपी चा तपास सुरू आहे असे सांगून अधिक बोलणे टाळले मात्र ह्या घडलेल्या धाडसी घटनेने एकच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे त्यामुळे पोलिसांनी त्वरित तपास चक्रे फिरवून आरोपींना जेरबंद करावे अशी मागणी होत आहे
"""":कजगाव पोलीस मदत केंद्रातील पोलिसांचा यशस्वी पाठला
दरम्यान बंदुकधारी भामटे हे नेरी मार्गे निमखेडी शिवार सोयगाव तालुका च्या दिशेने भरधाव गाडी घेऊन पडाले मात्र कजगाव पोलीस मदत केंद्राचे पोलीस कर्मचारी नरेंद्र विसपुते यांच्या सह कैलास पाटील ,विनोद पाटील,नरेंद्र शिंदे यांनी व भरधाव जाणाऱ्या गाडीचा पाठलाग यशस्वी रित्या केला व घटना घडण्याच्या तासाभरात गुन्ह्यात वापरलेली गाडी हस्तगत केले.
(सतीश पाटील ,भडगाव तालुका प्रतिनिधी )
टिप्पणी पोस्ट करा