अक्षय फंड (26) रा. अंधापुरी, गुंज खुर्द, ता. पाथरी जि. परभणी तसेच सागर मोरे (32) रा. शिवाजी नगर, सुटाळा बुद्रुक, ता. खामगाव जि. बुलढाणा अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
वाघोली येथे जलजीवन मिशन योजनेंतर्गत जलकुंभाचे काम निर्माणाधीन आहे. सदर कामाच्या ठिकाणी ठेवून असलेले शिवराज शिंदे यांचे बांधकाम साहित्य तसेच अंबुजा कंपनीच्या सिमेंटच्या 52 हजार 500 रुपये किंमतीच्या 150 बॅग आणि 9 क्विंटल लोखंडी सळाखी किंमत 63 हजार असा 1 लाख 15 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल लांबवला होता. याप्रकरणी तक्रारीवरून गुन्हा नोंद करीत हिंगणघाट पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने तपास सुरू केला. चोरटे वाशिम येथील तोडकरनगर, तंत्रनिकेतन परिसरात राहात असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी अक्षय फंड आणि सागर मोरे या दोघांनाही तोडकरनगर वाशिम येथून ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल व गुन्ह्यात वापरलेले वाहन असा 6 लाख 15 हजार 500 रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
ही (Jaljeevan Mission) कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी दिनेश कदम, ठाणेदार कैलाश पुंडकर यांच्या मार्गदर्शनात गुन्हे प्रकटीकरण पथकाचे नरेंद्र डहाके, सचिन घेवंदे, सचिन भारशंकर, विशाल बंगाले व सायबर सेलचे दिनेश बोथकर यांनी केली आहे.
टिप्पणी पोस्ट करा