जळगावातील मंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या गावी दोन गटात तुफान वाद : रस्त्यावर दगड, काचांचा खच

पाळधी राज्याचे पाणीपुरवठा मंत्री तथा जळगावचे पालकमंत्री ना गुलाबराव पाटील यांचे निवासस्थान असलेल्या पाळधी येथे दोन गटात तुफान दगडफेक झाल्याची घटना रात्री घडली आहे. दगडफेकीत तीन चारचाकीचे नुकसान झाले असून पोलिसांची जीप देखील फोडण्यात आली आहे.

नेमक प्रकरण काय?
जळगाव येथून निघालेली दिंडी ही पाळधी गावाच्या जवळून जात असतांना दिंडीवर काही समाजकंटकांनी दगडफेक केली. यात दिंडीतील काही भाविक जखमी झाले. दरम्यान, पाळधी गावात याची माहिती मिळताच दुसऱ्या बाजूने देखील दगडफेक करण्यात आली. यामुळे येथे एकच गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

दरम्यान, या प्रकाराची माहिती मिळताच पाळधी दूरक्षेत्रातून पोलीसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. रात्री उशीरापर्यंत या संदर्भात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. तर, या धुमश्चक्रीत काही वाहनांचे नुकसान झाल्याची माहिती देखील समोर आली आहे.

0/Post a Comment/Comments