फैजपूरात: एसीबी ची मोठी कारवाई : सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकासह तिघे जाळ्यात

फैजपूर: अवैध धंदे सुरू ठेवण्यासाठी तडजोडीअंती चार हजार रुपयांची लाच स्वीकारताना फैजपूर पोलीस ठाण्यातील सहाय्यक उपनिरीक्षकासह अन्य दोघा पोलिसांना जळगांव एसीबी च्या पथकाने शुक्रवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास पोलीस ठाण्यातच रंगेहाथ अटक केल्याने लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे.

बामनोद बीटचे एएसआय सांगळे यांच्यासह अन्य दोन पोलिसांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
 फैजपूर भागातील अवैद्य धंदे चालकाकडे सट्टा- पत्त्यांचा धंदा नियमित सुरू ठेवण्यासाठी व कारवाई न करण्यासाठी संशयतांनी पाच हजारांची लाच शुक्रवारी मागून त्यावर चार हजारात तडजोड केली मात्र याबाबत धंदे चालकाने एसीबी कडे तक्रार केल्या नंतर सापळा रचण्यात आला.
 फैजपूर पोलीस ठाण्याच्या आवारात चार हजार घेताना एएसआय सांगळे यांना अटक करण्यात आल्यानंतर अन्य दोघांचाही सहभाग आढळल्याने त्यांना चौकशीकामी ताब्यात घेण्यात आले. जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक शशिकांत पाटील व सहकाऱ्यांच्या नेतृत्वात हा सापळा यशस्वी करण्यात आला.

0/Post a Comment/Comments