शेत जमिनीच्या मोबदला मिळण्याची मागणी शेतकरीसंघटनेतर्फे धरणे आंदोलन

शेत जमिनीच्या मोबदला मिळण्याची मागणी शेतकरीसंघटनेतर्फे धरणे आंदोलन
सतीश पाटील भडगाव तालुका प्रतिनिधी
चोपडा तालुक्यातील गुळ नदीवर मध्यम प्रकल्प तयार झाल्यानंतर त्याच्या उजवा व डावा कालव्यासाठी सन २००८ मध्ये विरवाडे वर्डी विष्णपूर आडगाव वडती चोपडा नारोद खरद अंबाडे व नरवाडे तरया गावातील 600 शेतकऱ्यांच्या शेतजमिनी कालवा वितरिकेसाठी अधिग्रहण करून आज सोळा वर्ष पूर्ण झालेत मात्र प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना शासनामार्फत शेत जमिनीच्या मोबदला मिळालेला नाही त्याच्या जाब विचारण्यासाठी जळगाव येथील तापी पाटबंधारे विकास महामंडळ च्या कार्यालयाला प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी व शेतकरी संघटनेने घेराव घालून आंदोलन केलं. कार्यकारी संचालक श्रीयुत मंदाळे साहेब यांनी एक मे पर्यंत प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना शेत जमिनीच्या मोबदला निश्चित देऊ असं आश्वासन दिल्यानंतर तात्पुरता आंदोलन मागे घेतलं आहे मात्र संबंधित प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना दहा मे च्या आत मोबदला न मिळाल्यास तापी पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यालयातच सामूहिक आत्महत्या करणार असल्याचे निवेदन दिलेलंआहे.

( सतीश पाटील, भडगाव तालुका प्रतिनिधी)

0/Post a Comment/Comments