महाप्रसादाचे गोंडगाव भक्तपरीवराने सुंदर असे नियोजन करण्यात आले.

निष्काम कर्मयोगी जगदगुरू जनार्दन स्वामी मौनगीरी महाराज यांच्या आशीर्वादाने व अध्यात्म शिरोमनी श्री संत सदगुरु परम पूज्य महामंडलेश्वर स्वामी शांतिगीरीजी महाराज यांचा “जो करेल श्रमदान “”त्यासी घडेल चारीधाम “ या गुरु मंत्रावर आधारीत “संकल्प १२५३४५६७ तास महाश्रमदानाचा “”
           एकाच दिवशी भारत देशांतील ५०० ऐतिहासिक व प्राचीन धार्मिक स्थळावर जय बाबाजी भक्त परीवारातील ५०५०० व स्थानिक ५० हजार अशा १ लाख श्रमदान सेवकांचा सहभाग असणार आहे , त्यानिमित्ताने दि १७/३/२०२३ रोजी श्री क्षेत्र गोंडगावला श्री बाबाजींच्या आश्रमात प.पु.महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरीजी महाराज यांच्या प्रेरनेने व प्रमुख उपस्थितित बैठक संपन्न झाली व त्या बैठकीला जळगांव व धुळे जिल्ह्यातील सर्व जय बाबाजी भक्त परीवार मोठ्या संखेने उपस्थित होउन ,त्या बैठकीचे रूपांतर सत्संग सोहळ्यात झाले व प.पु.महामंडलेश्वर स्वामी शांतीगीरीजी महाराज यांचे मौन असल्यामुळे बाबाजींबरोबर असलेले प्रवक्ते आकाशजी यांनी महाश्रमदानाचे महत्व ,वैशिष्टे तसेच बाबाजींनी सुरु केलेल्या परंपरेचे मार्गदर्शन केले , श्री बाबाजींनी समाजाच्या उन्नतीसाठी जपानुष्ठान ,यज्ञ,गुरुकुल ,गोसेवा,कृषी-ऋषि सेवा व श्रमदान या परंपरा दिल्या या सर्व परंपरेत प.पु. बाबाजींनी श्रमदान या परंपरेला विशेष महत्व दिले.६० वर्षांपूर्वी बाबाजींनी सुरू केलेली ही परंपरा किती महत्वाची आहे हे आपल्या लक्षात येईल कारण या देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी यांनी सुध्दा “श्रमेव जयते “” हा नारा दिला आहे, हे या परंपरेचे यश आहे हे बघता उत्तराधिकारी श्री .श्री.१००८ महामंडलेश्वर स्वामी शांतीगीरीजी महाराज यांनी या भव्य महाश्रमदानाचा संकल्प एक वर्षांपूर्वी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या उत्तुंगपुतळ्याच्या चरणापाशी घेतला आहे श्रमदानाचा अर्थ निस्वार्थ होऊन समाजाच्या कल्याणाचे कार्य करणे ,श्रमदानाने केलेल्या कामाने देशाच्या आर्थिक सुधारणे सोबतच देशाच्या सामुहिक शक्तीमध्ये सुध्दा वाढ होत असते . या बाबाजींनी दिलेल्या संदेशावर आधारीत उत्तराधिकारी श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरीजी महाराज यांनी ज्या विविध क्षेत्रामुळे आपला देश प्रगती पथावर आहे अश्या अध्यात्मिक ,ऐतिहासिक ,आरोग्य ,शिक्षण ,ग्रामस्वच्छता ,दळणवळण,वृषारोपण,जलसिंचन अश्या महत्त्वाच्या क्षेत्रात १२५३४५६७ तास महाश्रमदान करण्याचा संकल्प केला आहे तसेच भडगांव येथिल माऊली हॅास्पिटलचे डॅा गणेश अहिरे यांनी ही सांगितले की श्रमदान हे हिंदुसंस्कृतीचा मुख्य गाभा आहे राष्ट्रासाठी सर्व मिळुन आपण काम करतो याची दखल ही गिनिज बुक ॲाफ वर्ड रेकॅार्ड यात नोंद होनार आहे तसेच महाश्रमदानाच्या जळगांव व धुळे जिल्ह्यामिळुन १०० फाईल ,ज्या श्रमदानसेवकांना मिळाल्या आहेत त्या त्वरित लवकरात लवकर संपुर्ण तपशिलांसह भरुन माऊली हॅास्पिटल भडगांव येथे ३दिवसात जमा करण्यास सांगितले 
या ऐतिहासिक श्रमदान सोहळ्यांचे उद्घाटन मा .भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या शुभहस्ते करण्याचा मानस असुन हा सोहळा जय बाबाजी भक्त परीवाराच्या दृष्टिने आपले सदगुरु निष्काम कर्मयोगी जगदगुरू जनार्दन स्वामी (मौनगिरीजी)महाराज यांच्या श्रमदान परंपरेला जागतिक स्तरावर नक्कीच घेऊन जाईल ,हे श्रमदानरूपी शिवधनुष्य जे भक्त उचलतील ते निश्चितच प.पु.बाबाजींच्या आशीर्वादास प्राप्त रहातील तसेच गोंडगाव आश्रम कमिटिमार्फत प.पु.बाबाजींचेही पुजन करण्यात आले तसेच पत्रकार प्रमोद ललवाणी ,अशोक परदेशी व नितीन सोनार यांचेही पुजन कमेटीमार्फत करण्यात आले व या बैठकीसाठी जय बाबाजी भक्त परीवार गोंडगाव यांनी तन मन धनाने परिश्रम घेतले ,व संत्संगाच्या शेवटी आलेल्या सर्व भक्त परीवाराला महाप्रसादाचे गोंडगाव भक्तपरीवराने सुंदर असे नियोजन करण्यात आले.

( सतीश पाटील,भडगाव तालुका प्रतिनिधी)

0/Post a Comment/Comments