संघटनेचे संस्थापक /अध्यक्ष आनंदभाऊ बाविस्कर यांच्या प्रमुख उपस्थितीत यावल तालुक्यातील विविध मागण्यानसाठी चक्का जाम आंदोलन करण्यात आले .
यावल तालुक्यातील विविध गावांमध्ये अनु . जाती / जमातीचे लोक मोठ्या प्रमाणात वास्तव्यास असून आजही ते पुर्णपणे शासनाकडून मिळत असलेल्या सुख - सुविधे पासून तसेच जिवनावश्यक मुलभूत गरजांन पासून वंचित आहे . याचे लेखी स्वरूपात निवेदन आम्ही वारंवार देऊन सुद्धा आमच्या समस्यांचे समाधानकारक निवारण झालेले नाही तरी आमच्या समस्यांकडे आपले लक्ष वेधण्याकरिता आज दि.३१/०३/२०२३ रोजी लोकशाही मार्गाने आम्ही आपल्या कार्यालया समोर आंदोलन करत आहोत तरी आमच्या प्रलंबीत मागण्या पुढील प्रमाणे
गावांच्या नावासह खालील समस्या
१) चारमळी येथे पिण्यांचे पाणी व्यवस्था , गावाअंतर्गत रस्ते , गावात लाईटाची व्यवस्था , शाळा सुरळीत चालू असणे , अंगणवाडी चारमळी येथे पाहिजे , चारमळी येथिल आदिवासी मुलाना एक वर्ष शिक्षणापासुन वंचित ठेवणाऱ्या शिक्षकावर तात्काळ कारवाई झालीच पाहिजे तसेच अतिरिक्त कारभार असणाऱ्या अंगणवाडी सेविकेची कारभार असल्यापासुन चौकशी करून अहवालाची प्रत आम्हाला दयावी .
२) टेंभीकुरण येथे रस्त्याचे काम तात्काळ करणे .
३) आसराबारीपाडा वर्ड्री खु ॥ ग्राम पंचायतीत समाविष्ट करणे , आसराबारीपाडा येथे अंगणवाडी उभारण्यात यावी .
४) धुळेपाडा हे सांगवी बु ॥ किवा बोरखेडा ग्राम पंचायतीत समाविष्ट करणे , धुळेपाडा येथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तात्काळ करण्यात यावी , धुळेपाडा येथे रस्त्याचे काम तात्काळ करण्यात यावे .
५) यावल तालुक्यातील अतिक्रमीत घरे नियमाकुल करण्यात यावे .
असे निवेदन गटविकास अधिकारी यांना निवेदन देते वेळी सांगण्यात आले की येत्या आठ दिवसात आमच्या मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असे संघटनेचे संस्थापक / अध्यक्ष आनंदभाऊ बाविस्कर यांनी सांगितले
अश्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले त्या प्रसंगी संघटनेचे जि . उपाध्यक्ष अशोक तायडे , यावल तालुका अध्यक्ष विलास तायडे , यावल तालुका युवक अध्यक्ष सतीश अडकमोल , यावल तालुका महिला मंच अध्यक्षा लक्ष्मीताई मेढे , तालुका उपाध्यक्ष इकबाल तडवी , उपाध्यक्ष सुनिल बारेला , उपाध्यक्ष अनिल इंधाटे , मिलिंद सोनवणे , मांगीलाल भिलाला तसेच असंख्य महिला व पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते .
तसेच यावल पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरिक्ष मोरे व काकडे तसेच त्यांच्या सोबत बंदोबस्त कामी पोलीसांचा मोठा ताफा उपस्थित होता.
टिप्पणी पोस्ट करा