यावेळी राष्ट्रीय कार्याध्यक्ष जगदीश इंगळे, जिल्हाध्यक्ष चैतन्य नन्नवरे , भगवान गायकवाड , अर्जुन मोरे, मोहन बिऱ्हाडे , कपिल जाधव , बापू सोनवणे,, विमलताई मोरे,शेनफडू सोनवणमे, किरण गायकवाड आदी उपस्थित होते.
यावेळी राजेश सोनवणे म्हणाले कि, २६ मार्च रोजी पहाटे ६ वजेच्या सुमारस प्रशांत शरद देशपांडे व अमित एकनाथ पाटील यानी नंबर नसलेला जेसीबी घेऊन पूतले पोलिसांच्या बंदोबस्तात काढुन टाकला होता.हा प्रकार येथील नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर समाजबांधवांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. त्यानुसार जिल्हापेठ पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना तात्काळ अटक करावी अशी मागणी केली.तसेच आरोपींची न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
टिप्पणी पोस्ट करा