भगवान गौतम बुद्धांच्या भव्य मूर्तीची स्थापना ; बौद्ध धम्मगुरू यांच्यासह हजारो उपासकांची उपस्थिती

जळगाव:शहरातील सुप्रीम कॉलनीत परिसरातील प्रबुद्धनगरात 'श्रावस्ती बुद्धविहारात' आज १९ मार्च रोजी सकाळी १२ वाजता थायलंड येथून आणलेल्या अष्टधातूपासून तयार करण्यात आलेली व सोन्याचा मुलामा असलेली भगवान गौतम बुद्धांची ५०० किलो वजनाची भव्य मूर्तीची स्थापना बौद्ध धम्मगुरू पूज्य सुगतवंस महाथेरो, पूज्य करूनानंद महाथेरो यांच्यासह इतर बौद्ध धम्मगुरू यांच्या उपस्थितितीत करण्यात आली.

सकाळी ९ वाजता बुद्धमूर्तीसह धम्म रॅली काढण्यात आली यावेळी बौद्ध उपासक, उपासिका मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.धम्ममय वातावरणात प्रभागातून धम्मरॅली काढण्यात आली यावेळी कार्यक्रमाचे मुख्य आयोजक डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष संदीप शिरसाठ यांनी बौद्धधम्म गुरु यांचे स्वागत केले.यावेळी बुद्धरूप मिरवणूक नंतर धम्मध्वजारोहण, बुद्धरूपाची प्रतिस्थापना, पूज्य भिख्खु संघाची धम्मदेसना आदी धार्मिक कार्यक्रम पार पडले.

यांची होती उपस्थिती.

यावेळी जळगाव शहराच्या महापौर सौ. जयश्रीताई महाजन, सरिताताई माळी, ऍड. राजेश झाल्टे,उपमहापौर कुलभूषण पाटील,विलास यशवंते,मुकुंद सपकाळे, नगरसेवक धुडकु सपकाळे,योगेश नन्नावरे,नगरसेवक सुरेश सोनवणे, एपीआय अमोल मोरे,विजय निकम,मिलिंद सोनवणे,शरद भालेराव,सतिश शिरसाठ,श्रीकांत तायडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरीचंद्र सोनावणे यांनी केले. तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भीमान फाईट गृपचे परिश्रम घेतले.

0/Post a Comment/Comments