यावल:साकळीत महिला शौचालयात जाण्यासाठी घ्यावा लागतो लोखंडी पेटीचा आधार !

मनवेल ता.यावल.साकळी येथील ग्रामपंचायत कार्यालयाजवळील सार्वजनिक महिला शौचालयाची फार मोठी दुरावस्था झालेली असून महिलांना शौचालयात जा-ये करण्यासाठी चक्क वीज वितरणच्या लोखंडी पेटीचा आधार घ्यावा लागत आहे.

तसेच महिला शौचालयाच्या अवती-भोवती खूप मोठे घाणीचे साम्राज्य पसरले आहे. एवढी मोठी शौचालयाची दुरावस्था पाहता महिलांच्या समस्येकडे एवढे दुर्लक्ष का? हा प्रश्न महिला वर्गाला पडलेला आहे. तरी ग्रामपंचायत प्रशासनाने सदरील सार्वजनिक महिला शौचालयाकडे त्वरीत लक्ष देऊन शौचालय समस्या मुक्त करावे अशी मागणी महिला वर्गाकडून केली जात आहे. देशात व राज्यात शासनाकडून महिला वर्गाला प्रथम प्राधान्य देत विविध अशा लोकपयोगी योजना राबविल्या जात असतात. त्यात प्राधान्याने शासनाकडून सुसज्ज सार्वजनिक महिला शौचालय बांधकामासाठी ग्रामपंचायतील मोठा निधी दिला जात असतो.

सांडपाणी हिरवेगार पडले आहे.तुंबलेल्या पाण्यामुळे या ठिकाणी साप व इतर सरपटणाऱ्या धोकादायक प्राण्यांचा धोका संभवू शकतो. त्यामुळे समस्याग्रस्त झालेल्या झालेल्या शौचालयात जातांना महिलांना रात्री-बेरात्री जीव मुठीत घेऊन जावे लागत आहे. तरी या महिला शौचायाच्या गंभीर समस्यांकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष झालेले दिसून येत आहे. तरी ग्रामपंचायतीने सदरील महिला शौचालयांची तसेच गावातील इतरही भागातील महिला शौचालयांकडे लक्ष देऊन सर्व शौचालय प्राधान्याने समस्या मुक्त करावे अशी मागणी गावातील महिला वर्गाकडून केली जात आहे.
सध्या ग्रामपंचायतीवर प्रशासकराज सुरू असून गावात कर वसुली सुरू आहे. तथापि ग्रामपंचायतीने थकबाकी कराची वसुली सक्तीने करावी परंतु गावातील इतरही नागरी समस्यांकडे सुद्धा जातीचे लक्ष द्यावे व त्या समस्या वेळच्यावेळी सोडवल्या जाव्या. विशेषतःप्राधान्याने महिलां वर्गाच्या समस्या सोडल्या जाव्या असे नागरिकांचे म्हणणे आहे.

0/Post a Comment/Comments