कजगाव येथे महिला दिवस मोठ्या उत्साहात साजरा

कजगाव येथे महिला दिवस मोठ्या उत्साहात साजरा

आठ मार्च महिला दिनानिमित्ताने महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन ज्योती अभियान कृषी विभाग भडगाव व भरारी महिला ग्राम संघ यांच्या वतीने महिला दिनाच्या औपचारिकता साधून महिलांवर होणारे अन्याय अत्याचार व सामाजिक न्याय व जनजागृती याविषयी मार्गदर्शन करण्यात आले यावेळी ॲड, संध्या साळुंखे मॅडम व आरोग्य विभागातील आकोडी मॅडम यांनी महिलांविषयी आपले मत व्यक्त केले भडगाव पोलीस स्टेशनचे पी आय राजेंद्र चौधरी यांनी महिलांना कायद्याविषयी मार्गदर्शन केले यावेळी महिला ग्रामीण दामिनी पथक अध्यक्ष कार्यकारिणी व महिला बचत गटाचे अध्यक्ष हजर होत्या कजगाव येथील सरपंच रघु अण्णा महाजन पत्रकार प्रमोद ललवाणी अमीन पिंजारी दीपक अमृतकर सतीश पाटील रविद्र साठे भडगाव कृषी विभागाचे अमोल सोनवणे आयोजक प्रतिभा साठे आधी ग्रामस्थ हजर होते.

(सतीश पाटील ,भडगाव तालुका प्रतिनिधी)

0/Post a Comment/Comments