जिओ कंपनीच्या टॉवर मधून बॅटरी, व डिझेल चोरी, स्कार्पियो गाडी व साहित्य जमा भडगाव पोलिसांची कारवाई.

जिओ कंपनीच्या टॉवर मधून बॅटरी, व डिझेल चोरी, स्कार्पियो गाडी व साहित्य जमा भडगाव पोलिसांची कारवाई.

तालुक्यातील निंभोरा शिवारातुन जियो कंपनीच्या टॉवर मधून बॅटरी, व डिझेल चोरी करून फरार होण्याच्या मार्गावर असलेले चोरट्यांच्या भडगाव पोलिस स्टेशन चे रात्र गस्तीवर असलेले पोलिसांनी पाठलाग करताच अज्ञात चोर गाडी व मुद्देमाल सोडून फरार झाल्याची घटना घडली आहे .या बाबत भडगाव पोलिस स्टशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी- सतिष दगा पवार, वय २८ वर्षे, धंदा जिओ टेक्निशियन, रा. स्वामी समर्थ मंदिरासमोर, बाळद रोड, भडगांव यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, भडगांव ते चाळीसगांव रोडवरिल निंभोरा ता. भडगांव शिवारातील शेतगट नं. २१९ / २ / अ मध्ये असलेले जिओ कंपनीचे टॉवर वरुन या ठिकाणी वस्तुंना हाताळणी झालेली बाबत अलार्म आलेला आहे. त्यावरुन पोलीस निरिक्षक राजेंद्र पाटील यांचे आदेशावरुन रात्रगस्त करित असलेले पोलिस कॉन्स्टेबल प्रकाश गवळी व पोलीस स्टेशनच्या शासकिय वाहनावरिल वाहन चालक पोकॉ संभाजी पाटील अशांसह पोलीस स्टेशनच्या शासकिय वाहनाने बातमीच्या रवाना झाले. याठिकाणी पोलीसांना हिरवट मेहंदी रंगाची स्कार्पियो गाडी क्र. एम एच-०५ जी - २५६८ हि रोडवर दुरुन उभी असलेली दिसली. रा वेळी स्कार्पियो गाडीतील संशयित आरोपीतांना पोलीस आल्याची चाहुल लागल्यामुळे ते त्या ठिकाणी त्यांचे ताब्यातील नमुद स्कार्पियो गाडीने तेथुन पळुन जाऊ लागले. म्हणुन पोलीस स्टाफ तसेच होमगार्ड अशांनी शासकिय वाहनाने सदर संशयित गाडीचा पाठलाग केला असता सदरची गाडी हि मळगांव गावाजवळ सदरचे वाहन उभे असलेले दिसले. या ठिकाणी पोलीसांनी संशयित स्कार्पियो गाडीजवळ जावुन पाहिले असता गाडीत कोणीच आढळुन आले नाही. गाडीत मिळालेल्या बातमीप्रमाणे संशयितरित्या असलेले तीन अनोळखी इसम तेथुन अंधाराचा फायदा घेवुन गाडी मळगांव गावाजवळ सोडुन पळुन गेले. त्यानंतर याठिकाणी जागेवरच गाडीतील आतील भागाची पाहणी केली असता गाडीत ०१) ईक्साईड एक्सप्रेस कंपनीच्या ४ बॅटऱ्या, ०२) प्रो ऑन कंपनीची लाल रंगाची बॅटरी, ०३) डिझेल ओढण्यासाठी बॅटरीवर चालणारे मशिन नळीसह, ०४) एक सेल बॅटरी, ०५)९ मोठ्या प्लॅस्टिक कँन पैकी एक डिझेल ने भरलेली, ०६) ०२ काळ्या रंगाच्या सँक (बँग) त्यामध्ये एक मोठा स्क्रू ड्रायव्हर, एक लोखंडी टामी, एक स्क्रू ड्रायव्हर, करवत पान (मोठे), करवत पान (लहान), पकड, वायर कटर, लोखंडी हत्यार, लहान बँटरी, ०७)SBI बँकेचे ATM त्यावर ABHAY KALE त्यावर ६५२२९४०९३९२५३९१३ असा नंबर असलेले, ०८) एक छोटी डायरी अशा वस्तु मिळुन आलेल्या आहेत. तरि, सदर बाबत श्री. सतिष दगा पवार, वय २८ वर्षे, धंदा जिओ टेक्निशियन, रा. स्वामी समर्थ मंदिरासमोर, बाळद रोड, भडगांव यांनी नमुद प्रकरणी यातील अनोळखी आरोपीतांविरुद्द फिर्याद दिल्याने भडगांव पोलीस स्टेशनला भादवि कलम ३७९,४२७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सफौ, कैलास गिते करित आहेत.भडगाव पोलीसांनी जप्त केलेले साहित्य.

(सतीश पाटील,भडगाव तालुका प्रतिनिधी)

0/Post a Comment/Comments