साकळी येथील जिल्हा परिषद मराठी मुलींच्या शाळेत वर्गाचा दरवाजा तोडून अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याची घटना दि.६ रोजीच्या रात्री घडलेली असून सदर घटनेमुळे शाळेच्या मालमत्तेच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालेला आहे.सदर शाळेत या अगोदरही चोरीचे प्रकार घडलेले आहे.शाळेच्या सभोवतालीच्या बंदिस्तवॉल कंपाऊंड चे बांधकाम अपूर्ण असल्यामुळे वारंवार चोरीच्या घटना घडत आहे.असे शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.सदर घटनेबाबत यावल पोलिसात तक्रार करण्यात आलेली आहे.
याबाबत पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार सविस्तर असे की,येथील जिल्हा परिषद मराठी मुलींच्या शाळेत दि.६ मार्च २०२३ च्या रात्री सुमारे दहा ते अकरा वाजेच्या दरम्यान काही एक कारण नसतांना अज्ञातांनी शाळेच्या एका वर्ग खोलीचा दरवाजा तोडून तीन हजार रुपयांचे नुकसान केलेले आहे.सदर घटनेबाबत सकाळच्या दरम्यान जेव्हा शाळेत काम करणारे काही मजूर आले तेव्हा त्या वर्गाचे दार तोडलेले असल्याचे त्यांच्या लक्षात आले.सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी तात्काळ संबंधी शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांना कळविले.घटनेची माहिती मिळताच शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन यावल पोलिसांना कळविले.पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
सदर शाळेत या अगोदरही चोरीच्या काही घटना घडलेल्या असून वारंवार होणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे शाळेच्या मालमत्तेच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे.त्याचप्रमाणे गेल्या जवळपास तीन ते चार वर्षांपूर्वी शाळेला बंदिस्त वॉल कंपाऊंड चे बांधकाम सुरू होते मात्र अतिक्रमणामुळे शाळेच्या एका बाजूचे बांधकाम रखडले आहे.या रखडलेल्या बांधकामामुळेच शाळेत वारंवार चोरीच्या घटना घडत आहे तसेच आजच्या घटनेलाही वॉल कंपाऊंडचे अपूर्ण बांधकाम जबाबदार आहे.असे शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आवर्जून पणे सांगितले.यावल पोलिसात सदर घटनेबाबत तक्रार देण्यात आलेली आहे.
सदर घटनास्थळी पाहणी दरम्यान मुलींच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिनेश माळी,मुलांच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सौरभ जैन (सर),ग्रामविकास अधिकारी हेमंत जोशी, माजी ग्रामपंचायत सदस्य खतिब तडवी,सदस्य नितीन फन्नाटे,सचिन सोनवणे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा