किशोर आप्पा पाटील बहुउद्देशिय सामाजिक संस्था, NRLM पंचायत समिती,भडगाव, कृषि विभाग भडगाव व नगरपालिका भडगाव यांचे संयुक्त विद्यमाने लक्ष्मण भाऊ मंगल कार्यालय भडगाव येथे महिला सक्षमिकरण मेळावा मा आमदार किशोर आप्पा पाटील व मा. सौ सुनिताताई पाटील नगरसेविका, नगरपालिका,पाचोरा यांचे प्रमुख उपस्थितीत घेण्यात आला सदर मेळाव्यात मा. विभागीय कृषि सहसंचालक नाशिक विभाग नाशिक मा. मोहन वाघ साहेब मुख्य मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.
त्यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजना (PMFME) योजनेतून लाभ घेवून उद्योजक बनून महीला सक्षमीकरण करणेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले, मार्गदर्शन करताना महिला बचत गटांनी, वैयक्तिक महिलांनी, बेरोजगार युवकांनी सदर योजनेअंतर्गत ३५ टक्के व जास्तीत जास्त १० लक्ष रुपयांपर्यंत अनुदान उपलब्ध असून ज्या महिला व्यवसाय करण्यासाठी इच्छुक असतील त्यांचे साठी जिल्हा संसाधन व्यक्तींची नियुक्ती करण्यात आलेली असून त्यांचे मार्फत ऑनलाईन अर्ज करून देणे, सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करणे व कर्ज मंजूर करून देण्यापर्यंत महिलांना कृषी विभागामार्फत मदत करण्यात येईल असे प्रतिपादन केले त्याचबरोबर सदर योजने अंतर्गत केळी व बटाटा वेफर्स ,पशुखाद्य युनिट , मसाला कांडप युनिट, विविध बेकरी प्रॉडक्ट्स, विविध दुग्धजन्य पदार्थ पनीर / तूप निर्मिती, पापड उद्योग, लाकडी घाना खाद्यतेल निर्मिती, लोनचे, जाम , जेली, आवळा कँडी, आवळा सुपारी, विविध फळांचे पल्प निर्मिती, सफेद मुसळी पावडर, गुळ व गुळपट्टी निर्मिती, सोयामिल्क व सोयावडी निर्मिती, फुटाणे, मुरमुरे, पॉपकॉर्न, केक व ब्रेड निर्मिती, रेडी टू ईट सर्व पदार्थ, विविध दाल उद्योग इ प्राथमिक प्रक्रिया उद्योगांना १० लक्ष रुपयांपर्यंत अनुदान देय असून जास्तीत जास्त महिलांनी कृषि विभागाशी संपर्क करून लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले. सदर कार्यक्रमास मा. उपविभागीय कृषी अधिकारी नंदकिशोर नाईनवाड साहेब, गटविकास अधिकारी रमेश वाघ साहेब, तहसीलदार मुकेश हिवाळे साहेब , नगरपालिका मुख्याधिकारी रवींद्र लांडे साहेब, तालुका कृषी अधिकारी गोरडे साहेब, ग्रामिण जीवनोन्नती अभियानाचे प्रशांत महाले सर, तालुका पशुवैद्यकिय अधिकारी आकडे मॅडम, जिल्हा संसाधन व्यक्ती प्रविण पाटील व समाधान पाटील, भुरा आप्पा पाटील इ उपस्थित होते. सदर वेळी मान्यवरांचे हस्ते PMFME योजनेंतर्गत कर्ज मंजूर प्रकरणांत मका भरडा पशुखाद्य युनिट साठी श्रीमती सुरेखा विकास पाटील, महिंदळे यांना 3 लाख 50 हजार रुपयांचे तसेच केळी वेफर्स निर्मिती साठी श्रीमती रंजना गुलाबराव महाले, भोरटेक यांना 4 लाख 74 हजाराचे चेक व DD चे प्रातिनिधीक स्वरूपात वाटप मा आमदार किशोर आप्पा पाटील व विभागीय कृषि सहसंचालक मोहन वाघ साहेबांचे हस्ते करण्यात आले त्याचबरोबर उपस्थित महिलांना मान्यवरांचे हस्ते पौष्टिक तृणधान्य मिनी किटचेही वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षा निमित्त महिलांना पौष्टीक तृणधान्याचे महत्त्व पटवून देण्यात आले तसेच मा. आमदार किशोर आप्पा पाटील व मा. विभागीय कृषी सहसंचालक मा. मोहन वाघ साहेब यांचे हस्ते पौष्टीक तृणधान्य सेल्फी पॉईंटचे उद्घाटन तसेच पौष्टिक तृणधान्य वर्षांतर्गत तृणधान्य विशेष महिना अंतर्गत फेब्रुवारी महिना विशेष- ज्वारी पिकाच्या घडी पत्रिकांचे विमोचन करण्यात आले सदर वेळी कार्यक्रमात पौष्टीक तृणधान्य आरोग्यविषयक माहितीचे फ्लेक्स व ज्वारी, बाजरी, नागली, राजगिरा, वरई /भगर या तृणधान्यांचे पौष्टीक गुणधर्मांसह प्रदर्शन ठेवण्यात आलेले होते. सदर कार्यक्रमाचे संपूर्ण सूत्रसंचालन व नियोजन कैलास मोरे सरांनी केले. कार्यक्रमातील सेल्फी पॉईंट सर्व महिलांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. तसेच कार्यक्रमात उपस्थित महिलांना PMFME बाबतचे अर्ज कृषि विभागा मार्फत उपलब्ध करून देण्यात आले. तसेच कार्यक्रमा नंतर NFSM अंतर्गत रब्बी ज्वारीच्या पीक प्रात्यक्षिकांना भेट देण्यात आली तसेच विविध योजनेंतर्गत ठिबक व यांत्रिकीकरण अवजारांची मा. विभागीय कृषी सहसंचालक नाशिक विभाग नाशिक यांनी तपासणी केली.
( सतीश पाटील, भडगाव तालुका प्रतिनिधी )
टिप्पणी पोस्ट करा