यावल तालुक्यातील कोसगाव येथे सरपंचाकडून पदाचा दुरुपयोग

यावल तालुक्यातील कोसगाव येथे सरपंच हे उपसरपंच व सदस्यांना विश्वासात घेत नाहीत सरपंच व ठेकेदार परस्पर कामे करतात. आणि पदाचा दुरुपयोग करून त्यांच्या नावे ग्रामपंचायतत्यांच्या नावे ग्रामपंचायत च्या चौदाव्या वित्त आयोगातील पैसे चेक द्वारे काढले आहेत. त्यांची त्वरित चौकशी करून महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 19 महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 मधील 391, नुसार कारवाई प्रस्तावित करावी.

या मागणीसाठी उपसरपंच सौ. मनीषा राकेश सपकाळे सह इतर सदस्य यांनी गटविकास अधिकारी यावल पंचायत समिती यावल यांच्याकडे मागणी केली असता सहाय्यक गटविकास अधिकारी यांनी अहवाल तयार करून गटविकास अधिकारी यांच्याकडे दिला व सदरच्या सरपंचांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून 7 दिवसाच्या आत आपले म्हणणे मांडा अन्यथा आपले काही एक म्हणणे नाही असे गृहीत धरून आपणावर वरिष्ठ स्तरावरून कारवाईसाठी प्रस्ताव पाठवण्यात येईल अशी नोटीस यावल पंचायत समिती गटविकास अधिकारी यांनी कोसगाव सरपंच यांना पाठविली आहे.

 त्यामुळे तालुक्यातील ग्रामीण भागात व राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
कोसगाव तालुका यावल येथील सरपंच व ठेकेदार यांनी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत कामाच्या कोणताही ठराव नसताना गावातील सार्वजनिक शौचालय व शोष खड्डे काम परस्पर सदस्यांना विश्वासात न घेता काम केलेले आहे सदर बाब नियमबाह्य असून पदाचा द्रूपयोगसदर बाब नियमबाह्य असून पदाचा दुरुपयोग असल्याचे उपसरपंच सौ मनीषा राकेश सपकाळे सह सदस्यांनी यावल पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती.

 त्यानुसार 14 डिसेंबर 2022 रोजी सहाय्यक गटविकास अधिकारी किशोर सपकाळे यांनी यावल तालुक्यातील कोसगाव ग्रामपंचायत जाऊन प्रत्यक्ष तपासणी केली व त्याचा अहवाल गटविकास अधिकारी उच्च श्रेणी पंचायत समिती यावल मंजुश्री गायकवाड यांच्याकडे सादर केला होता, त्यानुसार ग्रामपंचायतच्या मासिक व ग्रामसभा इतिवृत्त तपासणी केली असता सभेत सार्वजनिक संचालक व शोष खट्टी बांधकाम बाबत ग्रामपंचायत च्या मासिक व ग्रामसभा इतिवृत्त तपासणी केली असता सभेत सार्वजनिक संचालक व शोष खड्डी बांधकामाबाबत अथवा काम करणेबाबत कोणताही ठराव दिसून आलेला नाही.

चौदाव्या वित्त आयोगा, मधून स्वतःचे नावे पैसे काढून पदाचा दुरुपयोग केलेला आहे. याबाबत ग्रामपंचायत ची 14 व्या वित्त आयोगाची रोज, किर्द पासबुक तपासणी केली असता दोन वेळा प्रत्येकी 20 हजार रुपये काढलेले आहेत, रोज, किर्द तपासणी केली असता शेख अब्दुल्ला शेख हुसेन यांना शौचालय दुरुस्ती व मजुरी कामे दिल्याचे दिसून येते परंतु प्रमाणके दप्तरी आढळून आलेली नाही.

आपण आपल्या पदाचा दुरुपयोग केल्याची दिसून येत आहे 9 आपणांवर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 मधील कलम 39
( 1) नुसार पुढील कारवाई का? करण्यात येऊ नये याचा लेखी खुलासा तात्काळ सात दिवसांची  आपल्या पदाचा दुरुपयोग केल्याची स्पष्ट दिसून येत आहे.

आपणावर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 मधील कलम 39 (1) नुसार पुढील कारवाई का? करण्यात येऊ नये याचा लेखी खुलासा तात्काळ सात, दिवसांचे आत करावा अन्यथा आपले काही एक म्हणणे नाही असे गृहीत धरून आपल्यावर योग्य ती उपरोक्त कारवाई करण्यात येईल असे या नोटीसित नमूद करण्यात आले आहे. यामुळे तालुक्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे.

0/Post a Comment/Comments