निंभोरा खिर्डि धाब्यांवर देशी - विदेशी दारूची अवैध विक्री

निंभोरा - खीर्डी परिसरात आर्थिक चिरीमिरी मुळे मोठ्या प्रमाणात अवैद्य धंदे बोकळले आहे.

तसेच ठिकठिकाणी सुरू असलेल्या धाब्यांवर बेकायदेशीर देशी, विदेशी दारूची मोठ्या प्रमाणात खुलेआम विक्री होत आहे . तसेच परिसरात धाबा संस्कृती रुजली असून या धाब्यावर दारूची खुलेआम अवैद्य विक्री होत असल्याने परिसराचे नाव आता बदनाम होऊ लागले आहे.

तसेच बहुतांश ठिकाणी मुख्य रस्त्याच्या बाजूलाच अनेक धाबे असून नागरिक नेहमी रस्त्याने ये जा करीत असल्याने या ठिकाणावर मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू असते. तसेच अनधिकृतरित्या मद्य विक्री करणाऱ्या धाबा चालकांकडे दारू आणि बियर विक्रीचा कुठलाही परवाना नाही तरीही ते बिंधास्त खुलेआम-अवैद्य मद्य विक्री करत असल्याने याबाबत सर्वसामान्य नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

तसेच स्थानिक पोलीस प्रशासन अवैद्य दारू विक्री करणाऱ्या धाब्यांकडे जाणून बुजून डोळे झाक करीत असल्याने व कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्याचा आरोप सुज्ञ नागरिक करीत आहे.

0/Post a Comment/Comments