रावेर : येथील ग्रामीण रुग्णालयात कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी मीळावा यासाठी निळे निशाण सामाजिक संघटने तर्फे एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.

रावेर : येथील ग्रामीण रुग्णालयात कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी मीळावा यासाठी निळे निशाण सामाजिक संघटने तर्फे एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.

रावेर येथील तहसील कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले. रावेर ग्रामीण रुग्णालयात कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी मिळावा, तालुक्यात सन 2011 पूर्वी जे कुटुंब शासकीय जागेत अतिक्रमण करून राहतात त्यांची घरे नियमाकुल करण्यात यावे. या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले. याबाबत त्वरित कारवाई न झाल्यास प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा व रास्ता रोको आंदोलनाचा इशारा तहसीलदार यांना निवेदनात देण्यात आला आहे.

सदर निवेदनाच्या प्रती, मा.जिल्हाधिकारी सो.जळगाव, मा. शल्य चिकीत्सक सो. मा.सामान्य रुग्णालय जळगाव, मा. उपविभागीय अधिकारी साहेब फैजपूर, मा.अधिकारी साहेब रावेर यांना पाठविण्यात आलेल्या आहेत.

निळे निशान सामाजिक संघटनेच्या नंदाताई बाविस्कर, सदाशिव निकम, कुंदन तायडे, गुणवंत उंबरकर ,गोकुळ अटकाळे, तालुका महिला अध्यक्ष विद्या बाविस्कर, सचिव कविता शिंदे ,अश्विनी अटकाळे, उपाध्यक्ष चंद्रकांत सोनवणे ,विजय धनगर ,मुमताज तडवी, रेखा बेलदार , जोस्ना सुखाडे,  सरला झाल्टे, अनिता झाल्टे, आदी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments