जनकल्याण संस्थेतर्फे ज्येष्ठांसाठी मार्गदर्शन शिबिर भडगाव तालुका वकील संघ

जनकल्याण संस्थेतर्फे ज्येष्ठांसाठी मार्गदर्शन शिबिर भडगाव तालुका वकील संघ व भडगाव तालुका विधी सेवा समिती यांच्यातर्फे सीनियर सिटीजन व्यक्तींसाठी कायदे व शासकीय योजना बाबत सीनियर सिटीजन जनकल्याण संस्थेने श्री छत्रपती संभाजी महाराज सभागृह बाळद रोड भडगाव येथे शिबिर आयोजित केले होते. 
कार्यक्रमाच्या सुरुवातीस भडगाव येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे सहन्यायाधीश एस. एस. चव्हाण मॅडम व भडगाव वकिल संघाचे अध्यक्ष अॅड. रणजित राजेंद्र पाटील यांचे स्वागत जनकल्याण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री अनिल तात्या पवार व सचिव श्री कृष्णराव पवार यांनी केले मान्यवरांचे सत्कार करण्यात आले शिबिराचे सूत्रसंचालन वकील संघाचे अध्यक्ष श्री रणजित राजेंद्र पाटील यांनी केले.

 संस्थेबाबत माहिती श्री अनिल तात्या पवार यांनी दिली ज्येष्ठांसाठी कायद्याबाबत एडवोकेट अशोक बाग एडवोकेट पी के जैस्वाल तसेच एडवोकेट निलेश तिवारी यांनी अनमोल मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमती एस एस चव्हाण यांनी अध्यक्ष भाषणात सामाजिक दृष्टिकोन व समस्या याबाबत मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन जनकल्याण संस्थेचे अध्यक्ष एडवोकेट प्रकाश भाऊलाल तिवारी यांनी केले. या कार्यक्रमा वेळी भडगाव वकील संघाचे सदस्य एडवोकेट आर के वाणी एडवोकेट के टी पाटील एडवोकेट मुकुंद बी पाटील एडवोकेट गणेश वेलसे अॅड. विजय महाजन एडवोकेट महेंद्र पाटील एडवोकेट उपस्थित होते.

( सतीश पाटील, भडगाव तालुका प्रतिनिधी )

0/Post a Comment/Comments