येथील विविध विकासकामांसाठी माजी सरपंच मनोज धाडीवाल, सरपंच पुत्र तथा जय पाचपावली मित्र मंडळ चे अध्यक्ष अनिल महाजन,ग्रामपंचायत सदस्य अक्षय मालचे,दिनेश पाटील,अनिल टेलर,आशीष वाणी यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची पाळधी येथे भेट घेऊन कजगाव गावातील विविध विकासकामांसाठी निवेदन दिले यात ४० ते ४५ वर्षांपूर्वी बनविण्यात आलेली ग्रामपंचायत ची इमारत जीर्ण झाल्याने इमारत नवी बनविण्यासाठी निधी,गावातील दोन स्मशानभूमीकडे जाणारे रस्ते व सुशोभीकरण साठी निधी व गावातील तीन जिल्हा परिषदेच्या शाळेतील पटांगणात फेव्हर ब्लॉक बसविण्यासाठी निधी ची मागणी निवेदन देऊन करण्यात आली
(सतीश पाटील, गोंडगाव तालुका भडगाव प्रतिनिधी)
टिप्पणी पोस्ट करा