भडगाव वार्ताहर — तालुक्यातील मळगाव येथे गावामार्फत दरवर्षी श्री. रमता बाबा मंदिरावर गावात किर्तन सप्ताहाचे आयोजन केले जाते. या किर्तनाच्या कार्यक्रमात किर्तनकार महाराजांनी गावात श्री. विठ्ठल रुख्मिणी मंदीर पाहीजे. गावात मंदिर उभारण्यात यावे. या महाराजांच्या जाहीर केल्यानुसार गावातील नागरीक, भाविकांनी गावात श्री. विठ्ठल रुख्मिणी मंदीर लोकवर्गणीतुन उभारण्याचा संकल्प केला. या संकल्पानुसार गावातील नागरीक, भाविकांनी रमता बाबा मंदिराच्या बाजुला लोकवर्गणीतुन भव्य श्री. विठ्ठल रुख्मिणी मंदिर उभारलेले आहे. दि. ८ रोजी बुधवारी श्री. विठ्ठल रुख्मिणी प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजीत करण्यात आला होता. यावेळी गावातुन देवतांची मुर्त्यांची सवादय मिरवणुक काढण्यात आली. व मुर्त्या प्राणप्रतीष्ठा कार्यक्रमही दि. ९ रोजी झाला. या मिरवणुकीत मोठया संख्येने नागरीक, महिला, भाविकांची उपस्थिती होती. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले होते. मंदिरावर आकर्षक विदयुत रोषणाई व साज सजावटीने मंदीर आकर्षक बनलेले आहे. या कार्यक्रमाचे ३ दिवसासाठी आयोजन ग्रामस्थ मंडळी, भाविकांमार्फत करण्यात आलेले होते . यात दि. ८ रोजी गुरुवारी सकाळी ८ वाजता देव मिरवणुक, कलश याञा ,गणपती पुजन, भुमिपुजन मुर्तीस जलाधिवास , आरती, तसेच राञी ८ वाजता हभप, ज्ञानेश्वर माऊली बेलदारवाडी यांचे किर्तनाचा कार्यक्रम झाला . तसेच दि. ९ रोजी गुरुवारी शांतीसुक्त पठण, देवता पुजन, कलशस्नपन दिपोत्सव सायंपुजन, आरती, राञी ८ वाजता हभप. रामेश्वर महाराज कन्नड यांचे किर्तनाचा कार्यक्रम झाला . तसेच दि. १० रोजी शुक्रवारी सकाळी शांती सुक्त पठण, प्राणप्रतिष्ठा कलशारोहण ध्वजारोहण, हवन, महाआरती व महाप्रसादाचा कार्यक्रम झाला. प्रतिष्ठाचार्य पंडित पं. पु. श्री. प्रल्हाद पांडे पाचोरा, पौञाय पं. पु. पंडित जगदिश पांडे पाचोरा यांचे उपस्थितीत पुजा, विधी करण्यात आले . होम व महापुजेसाठी गावातील ९ जोडप्यांना बसविण्यात आले होते . या विविध कार्यक्रमासह , महाप्रसादाचा व दर्शनाचा लाभ ग्रामस्थ, महिला भाविकांनी घेतला. या कार्यक्रमाचे आयोजन मळगाव येथील ग्रामस्थ मंडळीमार्फत करण्यात आले होते. कार्यक्रम यशस्विततेसाठी संपुर्ण ग्रामस्थ मंडळी, ग्रामपंचायतीचे आजी माजी पदाधिकारी, विकासोचे पदाधिकारी, महिला , तरुण मंडळी आदिंनी विशेष परीश्रम घेतले. भक्तीमय वातावरणाने संपुर्ण परीसर दुमदुमला होता.मंदिरात भडगाव पञकार अशोकबापु परदेशी यांनीही भेट देउन दर्शन घेतले. पाचोरा निर्मलसिडसच्या संचालीका वैशालीताई सुर्यवंशी, बांबरुड प्र बचे रतन परदेशी, शिवसेना शिंदे गटाचे तालुकाप्रमुख संजय ( भुरा ) पाटील, कोठलीचे फौजी समाधान पाटील यांनीही मंदिरावर भेट देउन दर्शन घेतले.
फोटो — मळगाव येथे विठ्ठल रुख्मिणी मंदिरात होम, महापुजा करतांना ९ सपत्नीक जोडपे.
फोटो — मळगाव मंदिरात विठ्ठल रुख्मिणी यांच्या मुर्त्या.
( सतीश पाटील , ता. भडगाव प्रतिनिधी )
टिप्पणी पोस्ट करा