२३फेबुवारी २०२३ श्री.राष्ट् संत गाडगेबाबा जयंती निमित्त गोंडगाव ता. भडगाव जि. जळगाव येथे बाबांच्या प्रतिमेचे पुजन करून बाबांनी दिलेले संदेश, विचार, खरा देव माणसात आहे दगडात नाही, शिक्षण, स्वच्छता, मानवता, अंधश्रध्दा, कुविचार, बुरसटलेल्या रूढी परंपरा असे बाबांनी दिलेले विचार सांगून ते विचार अंगीकार करण्यातची प्रतिज्ञा करण्यातआली. प्रसंगी गावातील नागरिक बंधू व बघिणी, पत्रकार बंधू, ग्रामपंचायत प्रतिनिधी, समाजसेवक, व्यापारी , समाज बांधव, बालगोपल , लोकनियुक्त सरपंच यांचे पती समाज सेवक शिवाआपा, ग्रा. प. सदस्य राजूनाना, राहूल पा. लोकमत ता. पत्रकार अशोक बापू परदेशी, पत्रकार संजय कोतकर, एम. डी. टीव्ही न्युज चे प्रतिनिधी सतिष पा. पाहुणे, पी. के. मोरे सर, समाज सेवक रतिलाल पा., विजय साळुंखे, नामदेव सोनार, रविंद्र सुयंवंशी, संतोष मोरे टेलर, भरत निकम, तसेच संत गाडगेबाबा बहुउद्देशीय परीट सेवा मंडळ गोंडगाव. या सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष व समाज सेवक ललितभाऊ मांडोळे, उपाध्यक्ष किशोर मा., सचिव शामलाल मा. संचालक भाऊसाहेब ठाकरे , राहूल मा. वाल्मिक मां. भिमराव मांडोळे, गोरख मा.शिवलाल मा. सचिन मा.पुरुपषोत्तम जाधव,गणेश मराठे ऋषीकेष मांडोळे यांनसह अनेक जन उपस्थित होते.... ललितभाऊ मां. यानी आपले मनोगत व्यक्त करुन उपस्थितांचे स्वागत व आभार मानून कायॅक्रमाची सांगता केली.जय गाडगे जय गोपाला
( सतीश पाटील,भडगाव तालुका प्रतिनिधी)
टिप्पणी पोस्ट करा