जमिनीतून पाणी बघण्याची श्रीफळद्वारा अनोखी पद्धत
गोंडगाव तालुका भडगाव येथे पत्रकार सतीश पाटील यांच्या घरी भिलकोट तालुका मालेगाव येथील संजय कृष्णा निकम यांनी हातावर नारळ घेऊन जमिनीतले पाणी पाहणे केली व त्याच वेळी सांगितले होते .
की जमिनीत फक्त पंधरा ते वीस फुटावर पाणी लागेल दुसऱ्या दिवशी टुबवेल केल्यावर खरोखर पंधरा ते वीस फुटावर पाणी मोठ्या प्रमाणात उसळी घेत होते. त्यांनाही विद्या लहानपणापासून अवगत असून आतापर्यंत त्यांनी मालेगाव व जळगाव धुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाणी पाहण्याचा कार्यक्रम केले आहेत कोणी केव्हाही बोलावलं तरी ते पाणी पाहण्यासाठी तिथे जातात म्हणतात ना जमिनीचा अंत कोणी पाहू शकत नाही परंतु संजय निकम यांची अनोखी पद्धत आहे ज्या ठिकाणी पाणी आहे.
त्या ठिकाणी हातावरचे नारळ ऑटोमॅटिक उभे राहते त्यांना कोणी स्पर्श केला तरी नारळ पुन्हा खाली येते ज्या जमिनीत पाणी नाही तिथे नारळ उभे होत नाही आणि जिथे नारळ उभे राहिले तिथे पाणी शंभर टक्के असल्याची खात्री त्यांना होते निसर्गाची करणी आणि नारळ दाखवतो पाणी या उक्तीप्रमाणे त्यांना सर्वत्र प्रसिद्धी मिळत आहे.
( सतीश पाटील, भडगाव तालुका प्रतिनिधी )
टिप्पणी पोस्ट करा