वापर करून दिवसातून दोन वेळा (सकाळी ६ ते ११ व दुपारी २ ते ४ ) फोटो अपलोड करणे बंधनकारक केले आहे.
या निर्णयामुळे जिल्ह्यातील कुशल व अकुशल मजुरांकडून करण्यात येणारी रोजगार हमी योजनेतील सार्वजनिक कामे गत दोन महिन्यांपासून ठप्प आहेत.
या योजनेतून सार्वजनिक व वैयक्तिक लाभाची कामे करता येतात. रोजगार हमी योजनेतील काम करण्यासाठी मजुरांनी रोजगार कार्ड नोंदविणे गरजेचे असते. त्यानंतर ही कामे करता येतात. वैयक्तिक लाभाच्या योजनेत प्रत्यक्ष लाभधारक कुटुंबातील सदस्यांकडे रोजगार कार्ड असणे बंधनकारक असते.
सार्वजनिक कामे जसे पांधण रस्ता, शिवार रस्ता, बंधारे आदी कामे करताना ९० टक्के काम यंत्राने व दहा टक्के काम मजुरांकडून करून घेणे बंधनकारक असते. यापूर्वी कुशल व अकुशल कामांचे ६०:४० हे प्रमाण गावपातळीवर राखणे बंधनकारक असल्यामुळे सार्वजनिक कामे करण्यास मर्यादा येत होत्या.
आता हे प्रमाण जिल्ह्यासाठी ठरविण्यात आल्यामुळे रोजगार हमीतील कामांचा आराखडा तयार करताना वन विभाग, सामाजिक वनीकरण, जलसंधारण विभाग, तसेच वैयक्तिक लाभाच्या योजनांवरील मजूर यांच्या संख्येवरून ६०:४० प्रमाण राखले जाते. यामुळे रोजगार हमी योजनेतून रस्ते, शिवार रस्ते, पांदण रस्ते, तसेच बंधाऱ्यांची कामे मोठ्या प्रमाणावर मंजूर केली जातात व त्यात ठेकेदारी पद्धतीने शिरकाव केला.
या सार्वजनिक लाभाच्या कामांमध्ये मजुरांकडून ४० टक्के काम करून घेणे अपेक्षित असताना ठेकेदार संपूर्ण काम मजुरांकडून करून घेतात व ग्रामरोजगार सेवकास हाताला धरून केवळ कागदोपत्री मजुरांची हजेरी दाखवली जाते, अशा तक्रारी सरकारकडे गेल्या.
त्यामुळे आता सार्वजनिक लाभाच्या कामांवरील मजुरांची मोबाईल ॲपद्वारे हजेरी घेणे बंधनकारक केले आहे. पूर्वी हा नियम २० पेक्षा अधिक मजूर असलेल्या कामांसाठीच लागू होता. आता तो सरसकट लागू केला आहे. कामावर आल्यावर मजुरांचे दोन सत्रातील फोटो अपलोड झाले, तरच मजुरी मिळणार आहे.
टिप्पणी पोस्ट करा