ह भ प संजीव महाराज गलवाडेकर यांनी कीर्तनातून व्यक्त केले मत
शेतकरी राजा आज मोठ्या हिमतीने व परिश्रमाने आपले उत्पादन वाढवितो आहे पण त्याचा मालाला भाव नाही एवढेच काय पण पिकवून साठवून ठेवलेल्या मालाला संरक्षण देखील नाही बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांच्या मालाची चोरी होत आहे.
राजे शिवाजी महाराजांच्या काळात शेतकऱ्यांचा मालाच्या देठाला हात लावणाऱ्यांवर लगेच हात कापण्याची सजा देण्याची हिंमत राजांमध्ये होती आज मात्र ती परिस्थिती राहिलेली दिसत नसल्याची खंत संजीव महाराज गलवाडेकर यांनी शिव प्रतिष्ठान मित्र मंडळ व मौजे हिंगोणे येथे शिवजयंती निमित्त आयोजित कीर्तनाच्या कार्यक्रमात व्यक्त केली कार्यक्रमाच्या सुरुवातीला शिवाजी महाराज वेशभूषा गौरव प्रमोद सूर्यवंशी यांनी केली तर जिजाऊ ची भूमिका जयश्री रुपेश शिंदे या बालकांनी साकार केले यावेळी मौजे सरपंच उपसरपंच सह ग्रामस्थ हजर होते.
( सतीश पाटील, भडगाव तालुका प्रतिनिधी )
टिप्पणी पोस्ट करा