भडगाव तालुक्यातील लोण पिराचे येथील श्री. वाल्मीक अशोक पाटील यांना आपल्या उत्कृष्ट कार्याबद्दल स्वराज्य सरपंच सेवा संघामार्फत राज्यस्तरीय युवाभुषण पुरस्काराने सन्मानपञ देउन अहमदनगर येथील माऊली संकुल सभागृहात उपस्थित सरपंच सेवा संघाच्या पदाधिकारी, मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
या पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल श्री.वाल्मीक पाटील यांचा लोणपिराचे येथे भडगावचे पञकार श्री. अशोकबापु परदेशी, भडगाव वकील संघाचे माजी अध्यक्ष श्री. मुकुंद पाटील आदिंसह नागरीकांचे हस्ते शाल, पुष्पगुच्छ देउन सत्कार करण्यात आला.व लोन पिराच्या ग्रामपंचायत कार्यकारिणीने त्यांचे अभिनंदन केले आहे वाल्मीक पाटील हे भडगाव तालुका शिवसेना उपतालुकाप्रमुख व ग्रामपंचायत सदस्य अशोक पाटील यांचे चिरंजीव आहेत.
( सतीश पाटील, भडगाव तालुका प्रतिनिधी)
टिप्पणी पोस्ट करा