रावेर तालुक्यातील तासाखेडा: अवैद्य माती उत्खनन प्रकरणी महसूलची उदासीनता

रावेर तालुक्यातील तासखेडा येथे लघुपाटबंधारे विभागाचा कालवा जात असून विटभट्टी जवळ मोठ्या प्रमाणात जेसीबी मशीनच्या साह्याने अवैद्य माती उत्खनन करण्यात आले आहे.
तसेच कोणत्याही प्रकारची परवानगी नसताना अगदी खुले आम मातीची उत्खनन व वाहतूक केली जात आहे.
मात्र ,या गंभीर प्रकाराकडे पाटबंधारे विभागासह महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्यामुळे अवैद्य माती उत्खनन सुरू आहे.

परिणामी शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत  आहे. तसेच शासनाचा महसूल बुडविण्यास जबाबदार असणाऱ्या विरुद्ध योग्य ती कारवाई करण्यात यावी तसेच या गंभीर प्रकाराकडे संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेळीच लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
 तसेच जेसीबी मालक शुभम विकास चौधरी यांच्या बाबत पत्रकार संरक्षण समिती रावेर तर्फ तहसीलदार सो .रावेर यांना 24.1.2023 रोजी लेखी निवेदन देण्यात आले असून ही आज पावेतो महसूल विभागा मार्फत कोणत्याही प्रकारची कारवाई का ? करण्यात आलेली नाही. याचे कारण अद्यापही गुलदस्त्यात असून महसूल विभागा कारवाई करणार का याकडे तासखेडा परिसरातील नागरिकांचे लक्ष लागून आहे.

0/Post a Comment/Comments